निवाऱ्यांची दुरवस्था
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रवासी निवारे आहेत. यावर्षी झालेल्या वादळी पावसाने या निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक प्रवासी निवाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगवले तर अनेक ठिकाणी बसण्यासाठीचे ओटे तुटल्याने निवारे निकामी ठरले आहेत. दुरुस्तीची मागणी होत आहे.
पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा वीज द्या
शिरूर कासार : सध्या शेतकरी ज्वारी व तुरीला पाणी देण्यात व्यस्त आहेत. विहिरींना, बोअरला पाणी भरपूर आहे. मात्र, विजेच्या धरसोडीमुळे रात्री-अपरात्री शेतकरी जीव धोक्यात घालून पिकाला पाणी देत आहेत. शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
जनावरांचा ठिय्या
माजलगाव : शहरातील अनेक मार्गावर जनावरे ठिय्या मांडून बसत असल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. अनेकवेळा अपघात झाल्याचेदेखील उदाहरणे आहेत. ही जनावरे रस्त्यावरुन हटवावीत, अशी मागणी वाहनधारक, नागरिकांमधून केली जात आहे. परंतु अद्यापही याबाबत निर्णय घेतलेला नाही.