शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

दिलासा ! आठवडी बाजार सुरू, दुकाने रात्री ९ पर्यंत उघडी राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 7:04 PM

सणासुदीच्या दिवसांमुळे खरेदी- विक्रीत राहणार उत्साह

ठळक मुद्देपरिस्थिती येणार पूर्वपदावर

बीड : कन्टेनमेंट झोन वगळता जिल्ह्यातील इतर क्षेत्रात अभ्यासिका, पार्क, आठवडी बाजारासह काही बाबींना अटी व शर्तीसह गुरुवारपासून परवानगी देण्यात आली आहे. तसेच यापूर्वी परवानगी असणाऱ्या सर्व व्यवसाय, दुकानांना रात्री ९ वाजेपर्यंत कामकाज करता येणार आहे. बंदी आदेशातून सुट दिलेल्या सर्व सेवा व आस्थापनामध्ये वावरणाऱ्या सर्व व्यक्तींनी पूर्ण वेळ मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतराचे बंधने पाळणे आवश्यक आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडधिकारी राहूल रेखावार यांना दिले आहेत.

ग्रामीण भागात आठवडी बाजार सात महिन्यानंतर फुलणार आहेत. तर सर्वच दुकानांना रात्री ९ पर्यंत परवानगी मिळाल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण, शिकवणी देणाऱ्या संस्था इत्यादी ३१ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील. तर १५ ऑक्टोबरपासून सर्व शासकीय व खाजगी ग्रंथालय व अभ्यासिकांना कोविड नियम व सामाजिक अंतर व स्वच्छतेचे पालन करुन उघडण्यास परवानगी असेल. गार्डन, पार्क व इतर सार्वजनिक खुली ठिकाणे चालू राहतील. कन्टेनमेंट क्षेत्रा बाहेर केवळ व्यावसायिकांशी संबंधित प्रदर्शने चालू करण्यास परवानगी असेल. जिल्हयातील कन्टेनमेंट क्षेत्रा बाहेर स्थानिक आठवडी बाजार (जनावरांचे ) सुरु करण्यास परवानगी राहील. परवानगी असणाऱ्या सर्व व्यवसाय, दुकान, बाबींना रात्री ९ वाजेपर्यंत कामकाज करता येणार आहे. मात्र काेविडबाबतच्या नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक राहणार आहे.

ग्रामपंचायत, नगर पंचायत, पालिकेवर  जबाबदारीआठवडी बाजारात सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाजीपाला, अन्य विक्रेते व ग्राहकांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील. दोन व्यक्ती व विक्रेत्यांमध्ये ६ फूट अंतर असावे. विक्रेत्यांनी स्वत: दक्षता घ्यावी व ग्राहकांना नियमांचे पालन करण्यास सांगावे. उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करुन दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी गुटखा, तंबाखू व पान, धुम्रपानास बंदी असेल.  ग्रामपंचायत, नगर परिषद, नगर पंचायतने बाजार सुरु हाेण्याअाधी जागा सॅनिटाईझ करावी. विक्रेत्यांना बसण्यासाठी व ग्राहकांना उभे राहण्यासाठी खूणा निश्चित कराव्यात. प्रत्येक विक्रेत्याने हात सॅनिटायझ अथवा साबणाने स्वच्छ करावे. ताप, सर्दी खोकला, डोकेदुखी, श्वसत्रास असणाऱ्यांनी बाजारात यायचे टाळावे.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकBeedबीडMarketबाजार