शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

बीड शहरात कॉफीशॉपमध्ये आंबटचाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 23:41 IST

कॉफी पिण्याच्या नावाखाली कॉफी शॉपमध्ये बसून आंबटचाळे करणाऱ्या युगुलाचा अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी पर्दाफाश केला.

ठळक मुद्देअपर पोलीस अधीक्षकांचे दोन तास स्टिंग : अर्धनग्न अवस्थेतील युगुल ताब्यात

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कॉफी पिण्याच्या नावाखाली कॉफी शॉपमध्ये बसून आंबटचाळे करणाऱ्या युगुलाचा अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी पर्दाफाश केला. तसेच कॉफीशॉपवाल्यांची ‘दुकानदारी’ चव्हाट्यावर आणली. अर्धनग्न अवस्थेतील एका युगुलाला रंगेहाथ पकडले. बुधवारी रात्री ७ ते ९ दरम्यान असे दोन तास कबाडे यांनी बीड शहरात फिरून स्टिंग केले.शहरात अनेक सार्वजनिक ठिकाणी तरुण धुम्रपान, मद्यपानासारखी व्यसने करतात. याचा त्रास ये-जा करणाऱ्यांसह परिसरातील व्यापारपेठेला होतो. तसेच शाळा, महाविद्यालय, शिकवण्यांच्याजवळ कॉफी शॉप उघडले आहेत. कॉफी पिण्याच्या नावाखाली युगुलांसाठी हा जणू ‘अड्डा’च ठरत आहे. हाच धागा पकडून बुधवारी रात्री ७ वाजता विजय कबाडे यांनी स्वत: दुचाकीवरुन शहरात फेरफटका मारला. आधी सिध्दीविनायक कॉम्प्लेक्समध्ये कॉफीबरोबर सिगारेटचा झुरका ओढणाºयांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा अडगळीच्या ठिकाणी असलेल्या कॉफीशॉपकडे वळवला.शाहूनगर भागातील दहावी, बारावीच्या शिकवणीसह एक महाविद्यालय असलेल्या अपार्टमेंटच्या तळमजल्यातील एका कॉफीशॉपवर अचानक धाड टाकली. यावेळी एक युगुल पडद्याआड अर्धनग्न अवस्थेत दिसून आले. या दोघांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलिसांच्याकडे देण्यात आले. ही कारवाई विजय कबाडे यांच्यासह विशेष पथकाचे प्रमुख रामकृष्ण सागडे, पांडुरंग देवकते, रेवणनाथ दुधाणे, जयदीप सोनवणे, काकडे, गणेश नवले, हनुमान राठोड, अंकुश वरपे, सूरज काकडे आदींनी केली.पालकांचे मुलांकडे दुर्लक्षशाळा, महाविद्यालयासह शिकवणीच्या नावाखाली आपले पाल्य तासन्तास घराबाहेर असते. खरोखरच ते शिक्षणासाठी जातात काय ? याची पालकांनी तपासणी करणे गरजेचे आहे. सर्वच मुले वाईट नाहीत. मात्र, मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. गैरकृत्य टाळण्यासाठी मुलांशी वारंवार संवाद साधून त्यांचे ‘लोकेशन’ वेळोवेळी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्या मुलांना पॉकेटमनी किती द्यायचा ? पॉकेटमनी कशासाठी वापरतात याचाही विचार करण्याची गरज आहे.सीसीटीव्ही फुटेज ताब्यातकॉफीशॉपमध्ये दिवसभर अनेक युगुल बसून आंबटचाळे करीत असल्याचे चौकशीतून समोर आले. हाच धागा पकडून याच कॉफीशॉपमधील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. शॉपचालक राज संजीवन शिंदे याला ताब्यात घेतले आहे.फुटेजवरुन ‘ब्लॅकमेलिंग’ ?कॉफीशॉपमध्ये आंबटचाळे करताना दुकानमालक सीसीटीव्ही फुटेजवरुन युगुलांना ब्लॅकमेल करण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. कसलीही काळजी न घेता युगुल असे कृत्य करीत असल्याने धोक्याची घंटा नाकारता येत नाही.

टॅग्स :BeedबीडBeed S Pपोलीस अधीक्षक, बीडCrime Newsगुन्हेगारी