फोटो
शिरूर कासार : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत माझी वसुंधरा अभियानांतर्गत नगरपंचायतीच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन व सिंदफना नदीची स्वच्छता करीत इंधन बचत, पर्यावरणाचे रक्षण तसेच शारीरिक तंदुरुस्ती या त्रिसूत्रीचा संदेश देण्यात आला.
मुख्याधिकारी किशोर सानप, प्रथम नगराध्यक्ष रोहिदास पाटील, दत्ता पाटील, माजी उपनगराध्यक्ष बाबुराव झिरपे, प्रकाश देसरडा, गणेश भांडेकर, मुख्याध्यापक अप्पासाहेब येवले, ॲड. संतोष ढाकणे, लेखापाल दामोदर, नगरसेवक, नगरपंचायत कर्मचारी, नागरिक आणि कालिकादेवी विद्यालयाचे विद्यार्थी सायकलफेरीत सहभागी झाले होते. जवळपास चारशे सायकली नगरपंचायतीपासून शहरातील गांधी चौक, सुतारनेट, पोलीस स्टेशनपासून कालिकादेवी प्रवेश महाद्वारापर्यंत जिजामाता चौकात पोहोचल्या. याठिकाणी सायकल नित्य चालवण्याचे दहा फायदे सांगण्यात आले. याशिवाय इंधन बचत पर्यायाने पैशांची बचत आदी साध्य होणार असल्याने प्रत्येकाने सायकल चालवावी, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले. मंगळवारी सायकल रॅलीनंतर बुधवारी सिंदफणा नदीपात्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपंचायत, कालिकादेवी विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सिंदफना नदीपात्रात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. सुमारे ६०० किलो टाकाऊ प्लॅस्टिक गोळा करण्यात आले, तर पात्रातील झाडेझुड
पेही काढण्यात आली.