शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय इमारतीत स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:36 IST

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सर्व प्रशासकीय कार्यालये स्वच्छ करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची ओळख स्वच्छताप्रिय अधिकारी अशी आहे. मात्र,बीड जिल्ह्यातील अनेक कार्यालये हे अस्वच्छ अशा स्थितीमध्ये होते. दरम्यान मंगळवारपासून जिल्हाधिकारी यांनी सर्व प्रशासकीय कार्यालये स्वच्छ करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानूसार मंगळवारपासून स्वच्छता मोहिमेस सुरुवात झाली आहे.जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी सकाळी बीड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला भेट दिली. यावेळी त्यांना त्याठिकाणी अस्वच्छेते साम्राज्य पाहायला मिळाले, त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून कार्यालय स्वछ करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सर्व अधिकारी कर्मचा-यांनी हातात झाडू घेऊन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची स्वच्छता मोहीम सुरु केली. यावेळी सर्व कार्यालयात व विभागांमध्ये झाडू हातात घेऊन धूळ झटकली. तब्बल २० वर्षानंतर अशा प्रकारे या कार्यालयाची स्वच्छता होत असल्याचे काही कर्मचा-यांनी सांगितले.तहसील व इतर अनेक कार्यालयांमध्ये अस्वच्छतेचे प्रमाण अधिक आहे. शासकीय इमारतीमध्ये येणारे भिंतीवर थंकतात, कचरा, फळांचे आवरण परिसरात टाकतात. त्याठिकाणी असलेल्या स्वच्छता कर्मचा-यांचे देखील त्याक डे अनेक वेळा दुर्लक्ष होते. प्रत्येक कार्यालयात स्वच्छेतेसाठी कर्मचारी नेमलेले आहेत. मात्र, त्यांच्याकडून हे काम चखपणे बजावले जात नसल्यामुळे कार्यालयांची दुरावस्था झालेली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मध्यवर्ती कार्यालयात भेट दिल्यानंतर सर्व कार्यालय स्वच्छ झाडून व धुवून घेण्याच्या सुचना केल्या. तसेच रंगरोगटी करण्याचे देखील आदेश त्यांनी यावेळी दिले. कार्यालयात व्यक्ती आल्यानंतर त्याला प्रसन्न वाटावे असा यामागचा उद्देश आहे. ही मोहीम जिल्ह्यातील सर्व कार्यालर्यांमध्ये राबवण्याचे देखील आदेश पाण्डेय यांनी दिले आहेत. तसेच नागरिक ांनी देखील स्वच्छतेच्या संदर्भात सजग राहून कार्यालयात आल्यावर अस्वच्छा व भिंतीवर थुंकणे बंद बंद करणे गरजेचे आहे,असे मत संबंधित कार्यालयातील कर्मचा-यांनी व्यक्त केले. बीड मध्यवर्ती इमारतीमध्ये पाण्डेय यांनी भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी नामेदव टिळेकर, तहसीलदार किरण अंबेकर आदी उपस्थित होते.टापटिपीचे जिल्हाधिका-यांनी दिले धडेबीड येथील प्रशासकीय इमातीला भेट दिली त्यावेळी अस्ताव्यस्तपणे पडलेले जुने दस्ताऐवज जिल्हाधिकारी यांना दिसून आले. त्यावेळी संबंधित विभागीतील अधिका-यांनी हे सर्व स्वच्छता करावी व सर्व दस्ताऐवज व्यवस्थित ठेवण्यासाठी व्यवस्था करण्याच्या सुचना यावेळी अधिकारी कर्मचा-यांना दिल्यानागरिकांनी देखील स्वच्छतेचे नियम पाळावेतप्रशासकीय कार्यालय हे शासनाचे म्हणजेच सामान्य नागरिकांचेच आहेत. त्यामुळे त्यांनी देखील स्वच्छतेचे महत्त्व जाणून कार्यालयात आल्यावर अवस्छता करणे टाळावे. यापुढे अस्वच्छता करताना आढळ््यास संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

टॅग्स :Beed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडGovernmentसरकारSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान