शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉक होताच नागरिक सैराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:41 IST

बीड : लॉकडाऊनचे निर्बंध शि‌थिल केल्यानंतर सोमवारी जिल्ह्यात अनलॉकच्या पहिल्या दिवशी बाजारात सर्वच दुकाने उघडल्याने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली. ...

बीड : लॉकडाऊनचे निर्बंध शि‌थिल केल्यानंतर सोमवारी जिल्ह्यात अनलॉकच्या पहिल्या दिवशी बाजारात सर्वच दुकाने उघडल्याने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. तर किराणा आणि भाजी बाजारात वर्दळ कमी दिसून आली. शहरातील मोंढा, सुभाष रोडवर दिवसभर वाहतूक कोंडीचा अनुभव नागरिकांना आला.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. यातच सुरूवातीला किराणा, भाजी, बेकरी, आदी जीवनावश्यक वस्तूंच्या सेवेला काही तासांसाठी मुभा दिली होती. मात्र अत्यावश्यक सेवेत नसलेल्या आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश होते. त्यानंतर निर्बंध आणखी कडक करीत किराणा, भाजी, बेकरी या अत्यावश्यक सेवादेखील सलग पंधरा दिवस बंद ठेवण्यात आल्या. त्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागल्याने शासनाने ठरविलेल्या तिसऱ्या स्तरात बीड जिल्ह्याचा समावेश झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे सोमवारपासून शहरातील अत्यावश्यक सेवांसह अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकाने उघडली. कापड, मोबाईल, सराफा, भांडी आदी सर्वच दुकाने दोन महिन्यानंतर उघडली. तर दोन महिन्यांपासून तुंबलेली खरेदी करण्यासाठी लोक घराबाहेर पडले. त्यामुळे शहरातील सर्वच भागात वर्दळ दिसून आली. अनलॉकचा पहिला दिवस असल्याने ग्रामीण भागातून भाजी विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होती.

सुभाष रोडवर आदर्श मार्केट, सिद्धी विनायक संकुल, सुभाष रोड, माळीवेस , कारंजा, बशीरगंज, मोंढा भागातील विविध दुकानांवर ग्राहक दिसून आले.

---------

कोरोनाचे भान विसरले

अनलॉकनंतर पहिल्या दिवशी बाजारात उसळलेली गर्दी पाहता लोक कोरोनाचे भान विसरल्याचे दिसून आले. दुकानांमध्ये सॅनिटायझर शोभेलाच होते. अनेक जण मास्क वापरताना दिसून आले. तर काही जण उघड्या तोंडाने फिरताना दिसून आले. भेळ, चहाच्या गाड्यांभोवती लोकांचा गराडा दिसून आल्याने कोरोनाचे भान विसरले की काय? असे वाटत होते.

------------

सोशल डिस्टन्स वाऱ्यावर

कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने साथरोग कायद्यानुसार नियम सुरुवातीपासून लागू केलेले आहेत. मात्र सोमवारी अनलॉक म्हणजे रान मोकळे अशा अविर्भावात दुकानांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. त्यामुळे प्रशासनाला पुन्हा कठोर पाऊल उचलावे लागणार आहे.

---------

वाहतुकीची कोंडी

अनलॉकमुळे नागरिक खरेदीसाठी लेकराबाळांसह घराबाहेर पडले होते. तर माल वाहतुकीच्या वाहनांची ये- जा सुरू होती. दुचाकी, चारचाकी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची शहरात जागोजागी कोंडी झाली होती.