विठ्ठल जाधवलिखित ‘उंदरीन सुंदरीन’ बालकविता संग्रहाचे विमोचन एकनाथ आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ‘उंदरीन सुंदरीन’ या काव्यसंग्रहात बाल मनाचा विचार ग्राम जाणिवांतून केल्याचे प्रकर्षाने जाणवते, असे त्यांनी सांगितले. बालसाहित्य निर्मिती मागील प्रेरणा विषद करून त्यांनी स्वानुभव कथन केले. गावखेड्यातील बालकांस बालसाहित्य वाचायला मिळणे गरजेचे आहे. पालक, शिक्षक यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून मुलांमधील उपजत कलागुण विकसित करावेत. आदर्श माणूस घडविण्यासाठी बालसाहित्य महत्त्वापूर्ण भूमिका निभावेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उमेश कदम (मुंबई), दादाराव वालेकर, प्रा.डॉ. भाऊसाहेब नेटके, उद्धव खेडकर, रामनाथ कांबळे, सानिका खेडकर, संकेत जाधव यांची यावेळी उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन : विठ्ठल जाधवलिखित ‘उंदरीन सुंदरीन’ या बालकविता संग्रहाचे प्रकाशन करताना साहित्यिक एकनाथ आव्हाड, उमेश कदम यांच्यासह लेखक विठ्ठल जाधव आदी.