शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

पेप्सीचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; नागरिकांनी घराचे पत्रे उखडून नराधमास पकडले

By सोमनाथ खताळ | Updated: March 17, 2023 18:10 IST

आरोपीच्या दारात मुलीची चप्पल दिसल्यानंतर नागरिकांनी पत्रे काढून घरात प्रवेश केला.

बीड : अवघ्या आठ वर्षाच्या चिमुकलीला पाच रुपयांच्या पेप्सीचे आमिष दाखवून ४० वर्षाच्या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. ही संतापजनक घटना पेठबीड भागात गुरुवारी दुपारी घडली. तीन तास मुलगी बेपत्ता राहिल्याने आईने तिचा शोध घेतला. आरोपीच्या दारात मुलीची चप्पल दिसल्यानंतर नागरिकांनी पत्रे काढून घरात प्रवेश केला. यावेळी हा नराधम कुकर्म करताना रंगेहात पकडला. याप्रकरणी पेठबीड पोलिस ठाण्यात पोक्सोसह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित मुलगी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास खेळण्यासाठी घरातून बाहेर पडली. याचवेळी गल्लीतीलच एका ४० वर्षाच्या नराधमाची तिच्यावर नजर गेली. त्याने तिच्या हातात पाच रुपये टेकवून तेथीलच एका दुकानातून पेप्सी आणण्यास सांगितले. ही मुलगी पेप्सी घेऊन येताच तिला आपल्या घरात नेत अत्याचार केला. इकडे मुलीची आई तिचा शोध घेत होती. सर्व गल्ली शोधल्यानंतर ती कोठेही न दिसल्याने तिने रडण्यास सुरुवात केली. याचवेळी आईला मुलीची चप्पल या नराधमाच्या घराबाहेर दिसली. तिने दरवाजा वाजवला; परंतु कोणीही आतून प्रतिसाद दिला नाही.

आईने आरडाओरडा केला. त्यामुळे गल्लीतील लोक जमा झाले. त्यांनी घराचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला असता हा नराधम नग्नावस्थेत आढळला. मुलगीही घाबरलेल्या अवस्थेत रडताना दिसली. नागरिकांनी त्याला चोप दिला. यात तो जखमी झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तो सध्या उपचार घेत असून त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी एक पोलिस कर्मचारीही तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड