शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

बालविवाह करणार नाही, आम्हाला शिकायचंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:33 IST

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : ‘आम्ही १८ वर्षांच्या आत लग्न करणार नाही, जर बालविवाहाच्या माध्यमातून आमच्या शिक्षणात बाधा आणली, तर ...

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : ‘आम्ही १८ वर्षांच्या आत लग्न करणार नाही, जर बालविवाहाच्या माध्यमातून आमच्या शिक्षणात बाधा आणली, तर त्यास समितीच जबाबदार राहील,’ अशी शपथ घेत अंबाजोगाई व धारूर तालुक्यातील एक नव्हे, दोन नव्हे, तर ६०१ मुलींनी आत्मभानाचा निर्धार करीत शिवाय लहान वयात बोहल्यावर चढण्याआधी सामाजिक परिवर्तनाला बळ दिले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात होणारे बालविवाह रोखण्यासाठी अंबाजोगाईच्या मनस्विनी महिला प्रकल्पाच्या पुढाकाराने ३० गावांमधून सुरू असलेली ही चळवळ व्यापक करण्यासाठी ‘मनस्विनी’च्या प्रमुख प्रा. डॉ. अरुंधती पाटील-लोहिया यांनी पुढाकार घेतला आहे.

अंबाजोगाई तालुक्यात २०, तर धारूर तालुक्यात १० अशा ३० गावांमध्ये निर्धार समानता प्रकल्प राबविला जात आहे. बालविवाह प्रतिबंध, हुंडा या प्रथेविरुद्ध जनजागृती, लिंगभाव समानता हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा संदर्भ घेत ३० गावांमध्ये बालविवाह प्रतिबंधक समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या समितीची माहिती संपूर्ण गावकऱ्यांना व्हावी, यासाठी मनस्विनी महिला प्रकल्पाच्यावतीने गावात फलक लावलेला आहे. समितीतील सदस्यांचे क्रमांक तसेच चाईल्ड लाईन्सचा टोलफ्री क्रमांक या फलकावर लावला आहे. यामुळे जनजागृती होण्यास मोठी मदत होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन होते. या कालावधीत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुपचुप गेटकेन विवाह होऊ लागले. यात प्रामुख्याने १२ ते १६ वर्षे वयाच्या मुलींचे विवाहदेखील जुळू लागले. अशा विवाहांना प्रतिबंध करण्यासाठी वेळोवेळी ग्रामसेवकांच्या संपर्कात राहून मनस्विनीच्या माध्यमातून गावातील समित्यांना प्रशिक्षण दिले. बालविवाह रोखण्यासाठी गावात काय उपाययोजना करता येऊ शकतात? याचे मार्गदर्शन केले तसेच बालविवाह थांबलेल्या मुलींच्या पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे प्रयत्न सुरू केले. कोरोना काळात मनस्विनीच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी २१ बालविवाह रोखले, ही या चळवळीची जमेची बाजू म्हणावी लागेल.

१० गावांमध्ये आत्मभान केंद्रांची स्थापना

किशोरवयीन मुली व महिलांसाठी गावांमध्येच आत्मभान केंद्रांचीही सुरुवात झाली आहे. या केंद्रांमार्फत किशोरवयीन मुली व महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण गावातच उपलब्ध करून दिले जात आहे. गावातील युवक-युवतींचे बालविवाह होऊ नयेत यासाठी ग्रामसमित्याही पुढाकार घेत आहेत, तर आत्मभान केंद्रात ५० विविध पुस्तके, खेळाचे विविध साहित्य, कपाट, सतरंजी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. उर्वरित गावांमध्येही या केंद्रांची निर्मिती होणार असल्याचे मनस्विनी महिला प्रकल्पाच्या प्रा. डॉ. अरुंधती पाटील-लोहिया, अंबाजोगाई, यांनी सांगितले.

का होतात बालविवाह?

बीड जिल्हा हा ऊस तोडणी कामगारांचा तसेच अनेक सामाजिक समस्यांनी ग्रासलेला जिल्हा म्हणून आजही ओळखला जातो. कोरोनाच्या परिस्थितीत बीड जिल्ह्यामध्ये अनेक बाल विवाह होऊ लागले आहेत. शाळा बंद आहेत. हाताला गावात काम नसल्याने इतर ठिकाणी रोजगारासाठी कुटुंबे स्थलांतरित होत आहेत. ऊसतोडीहून परतलेल्या कामगारांकडे पैसा आला आहे. म्हणून व्यसनाधीनता बळावली. या पार्श्वभूमीवर वयात आलेल्या मुलींचे विवाह लावण्याकडे कल वाढत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

६०१ मुलींनी घेतली शपथ

३० गावांमधील ६०१ युवतींनी आम्ही १८ वर्षांच्या आत लग्न करणार नाही, अशी शपथ घेतली आहे व तसे निवेदन प्रत्येक गावांतील बालविवाह प्रतिबंधक समितीला दिले आहे. जर बालविवाहाच्या माध्यमातून आमच्या शिक्षणात बाधा आणली, तर समितीच त्यासाठी जबाबदार असेल, अशा आशयाचे निवेदन देत बालविवाह न करण्याची शपथच या मुलींनी घेतली आहे.

140821\14bed_4_14082021_14.jpg~140821\14bed_3_14082021_14.jpg~140821\14bed_2_14082021_14.jpg