शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी तालुक्यात कोंबड्यांचे मृत्यू सत्र थांबेना; पाटण-सांगवी येथे 15 कोंबड्यां दगावल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 14:43 IST

Bird Fluआष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील आजिनाथ जगताप यांचे गावाच्या बाहेर अडीज हजार कोंबड्याचे शेड आहे.

कडा ( बीड ) : कुक्कुटपालन शेडमधील 15 कोंबड्यां अज्ञात रोगाने दगावल्या असल्याची घटना सोमवारी रात्री आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथे घडली. आष्टी तालुक्यातील कोंबड्या मरण्याचे मृत्यू सत्र सुरूच असून याचे निदान होत नसल्याने शेतकरी व कुक्कुटपालन व्यवसायिकांत धास्ती वाढत चालली आहे. 

आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील आजिनाथ जगताप यांचे गावाच्या बाहेर अडीज हजार कोंबड्याचे शेड आहे. यातील  15 कोंबड्या सोमवारी रात्री अचानक अज्ञात रोगाने दगावल्याची घटना घडली आहे. आजवर तालुक्यात  शिरापुर,पिंपरखेड, धानोरा, केरूळ, सराटेवडगांव, खिळद, येथे पक्षी व कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. बर्ड फ्ल्यूची धास्ती असली तरी आजवर पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवलेले अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मग आज अचानक मेलेल्या कोंबड्याचा मृत्यू नेमकं कशाने झाला हे अहवाल आल्यावरच समजेल. मंगळवारी सकाळी पशुवैद्यकिय अधिकारी डाॅ.  अरूण तुराळे यांनी पंचनामा करून मृत कोंबड्याची विल्हेवाट लावली.

तालुक्यातील कोंबड्याचे मृत्यू सत्र थांबेना आष्टी तालुक्यातील शिरापुर, सराटेवडगांव, केरूळ, खिळद, धानोरा, पिंपरखेड येथे पक्षी व कोंबड्याचा मुत्यु झाला. त्याचा अहवाल देखील निगेटिव्ह आला. मग बर्ड प्युची लागण नसली तरी नेमक मरण्याचं कारण काय अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  याबाबत आष्टी येथील तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ. मंगेश ढेरे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, आजवर मरण पावलेले पक्षी किंवा कोंबड्या या बर्ड फ्ल्यूने  मेल्या नाहीत. पाटण येथील प्रकरणात अहवाल येताच निदान समोर येईल.

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूBeedबीड