शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उपसरपंच आणि ग्रामसेवकाने फसवले; माजी सैनिकाचे संपूर्ण कुटुंब उपोषणाला बसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 19:20 IST

तत्कालीन उपसरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून एका माजी सैनिकास फसवले

ठळक मुद्दे उपोषणकर्त्या माजी सैनिकाची तब्येत ढासळल्याने ना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

माजलगाव : तालुक्यातील दिंद्रुड येथिल  तत्कालीन उपसरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून एका माजी सैनिकास शासकीय जमिनीवरील प्लॉट विकला. दरम्यान, ही बाब उघड झाल्याने माजी सैनिकाने जागा नावे करण्याच्या मागणीसाठी अपंग मुलांनासह पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवारपासून (दि.१७)  उपोषणास सुरुवात केली आहे. दरम्यान उपोषणकर्त्या माजी सैनिकाची तब्येत ढासळल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १५ ऑक्टोंबर २०१८ रोजी दिंद्रुड येथील ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत कार्यरत असलेले ग्रामसेवक राजकुमार झगडे व उपसरपंच युवराज ठोंबरे व गणपत ठोंबरे यांनी येथील गटनंबर ७१४ मध्ये कुठलाही वारस नसणारा शासकीय प्लॉटचे बनावट दस्तावेज तयार करून जागेचा बांधकाम परवाना गणपत ठोंबरे यांच्या नावे असल्याचा देखावा केला. दरम्यान, माजी सैनिक असणाऱ्या सुरेश मुंडे यांच्या पत्नी सुमन मुंडेला त्यांच्या अडाणीपणाचा फायदा घेत हा प्लॉट ग्रामसेवक झगडे व उपसरपंच ठोंबरे यांनी विक्री केला. कालांतराने शासकीय कामासाठी प्लॉटची मूळ कागदपत्रे लागत असल्याने सुरेश मुंडे यांनी पीटीआर काढण्यासाठी ग्रामपंचायत येथे गेले. यावेळी हा प्लॉट शासकीय असल्याची बाब उघड झाली. 

यावेळी त्यांनी संबंधित उपसरपंच युवराज ठोंबरे ग्रामसेवक झगडे यांना याचा जाब विचारला असता त्यांनी सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर जीव मारण्याचे धमक्या दिल्या. माजी सैनिक मुंडे यांनी बीडपासून अनेक कार्यालयात झालेल्या अन्यायाची दाद मागितली. कुठेच न्याय मिळत नसल्याने शेवटी माजी त्यांनी अपंग मुलांसह परिवारासोबत येथील पंचायती कार्यालयासमोर सोमवारपासून आमरण उपोषण सुरु केले. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने प्रशासनाची मोठी धांदल उडाली. दरम्यान, मुंडे हे आपल्या मागणीवर ठाम असून माझा प्लॉट माझ्या नावे करा. अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोरच जीव देणार असल्याच्या पवित्रा मुंडे परिवाराने घेतला आहे आहे.

मोजणीसाठी भूमिअभिलेखला कळवलेसदरील उपोषण प्रकरणात संबंधित ग्रामसेवक यांना खुलासा मागवला आहे. मोजणीसाठी भूमिअभिलेखला कळवण्यात आले असून एक महिन्यात  प्रकरण निकाली काढण्यात येईल.- प्रज्ञा माने भोसले, गटविकास अधिकारी, माजलगाव 

टॅग्स :agitationआंदोलनBeedबीड