शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये पडताळणीआधीच बदलीमुळे पेच निर्माण होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:17 IST

बीड : येथील जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या ३४७१ शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या प्रक्रियेला मंगळवारी सुरुवात झाली. बदल्यांचे आदेश प्राप्त करण्यापासून कार्यमुक्ती व रुजू होण्यासाठी शिक्षकांमध्ये धांदल उडाली होती. दरम्यान बदली प्रक्रियेआधी आॅनलाईन माहिती भरणाऱ्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी बदल्यांआधीच होणे गरजेचे होते असा सूर उमटत आहे.बीड जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया मागील ...

बीड : येथील जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या ३४७१ शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या प्रक्रियेला मंगळवारी सुरुवात झाली. बदल्यांचे आदेश प्राप्त करण्यापासून कार्यमुक्ती व रुजू होण्यासाठी शिक्षकांमध्ये धांदल उडाली होती. दरम्यान बदली प्रक्रियेआधी आॅनलाईन माहिती भरणाऱ्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी बदल्यांआधीच होणे गरजेचे होते असा सूर उमटत आहे.

बीड जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया मागील काही दिवसांपासून सुरु झाली. पहिल्या टप्प्यात १५९ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचे सोपस्कर पार पडले. यातील लातूर जिल्ह्यातून आलेल्या ४२ पैकी २२ शिक्षकांना आदेश मिळाले. दरम्यान सोमवारी ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हा अंतर्गत बदल्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिका-यांना आदेश जारी केले. त्यानुसार मंगळवारी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाºयांना जिल्हा अंतर्गत बदल्यांबाबत निर्देशित केले. तसेच संबंधित शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करण्याबाबत कळविण्यात आले आहे. मंगळवारी सकाळपासूनच या आदेशाची शिक्षकांना प्रतीक्षा होती. आदेश प्राप्त होताच धांदल सुरु झाली.

दरम्यान पर्यायानुसार एकही शाळा उपलब्ध न झाल्याने ५७५ शिक्षक विस्थापित झाले. यात शिक्षक, मुख्याध्यापक, सहशिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांना पुन्हा ३० मे रोजी आॅनलाईन अर्ज करावयाचे आहेत. त्यानंतर ३१ मे रोजी बदल्यांचे आदेश निघतील असे शिक्षण विभागात ऐकायला मिळाले. मंगळवारी बदल्यांबाबत निर्देश मिळाल्यानंतर आदेश प्राप्त करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयांमध्ये गर्दी पहायला मिळाली.

टॅग्स :Beedबीडzp schoolजिल्हा परिषद शाळाMarathwadaमराठवाडा