शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये आता १ लाख ३२ हजार क्विंटल तूर खरेदीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:56 IST

नाफेडच्या वतीने हमीदराने खरेदीसाठी जिल्ह्यात सुरु केलेल्या केंद्रांवर तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंत केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी मुदतवाढ दिली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या परंतु वंचित राहिलेल्या शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. मात्र या कालावधीत पाच दिवस सुट्या आल्याने जवळपास एक लाख ३२ हजार २३६ क्विंटल तूर खरेदीसाठी १७ दिवसांचाच अवधी मिळणार आहे.

ठळक मुद्दे१७ दिवसांची मुदतवाढ : १६ हजार ९२५ शेतकऱ्यांना दिलासा

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नाफेडच्या वतीने हमीदराने खरेदीसाठी जिल्ह्यात सुरु केलेल्या केंद्रांवर तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंत केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी मुदतवाढ दिली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या परंतु वंचित राहिलेल्या शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. मात्र या कालावधीत पाच दिवस सुट्या आल्याने जवळपास एक लाख ३२ हजार २३६ क्विंटल तूर खरेदीसाठी १७ दिवसांचाच अवधी मिळणार आहे.१ फेब्रुवारीपासून शासनाने नाफेडच्या वतीने हमीदराने तूर खरेदीसाठी जिल्ह्यात १५ केंद्र सुरु केले होते. कधी गोदाम तर कधी बारदाना तर कधी तांत्रिक अडचणींमुळे तूर खरेदीत अडथळे आले होते. ७७ दिवसात १५ हजार ७६४ शेतकºयांची १ लाख ६८ हजार ५४४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यानंतर १८ एप्रिलपासून खरेदी बंद केली होती. त्यामुळे १८ एप्रिलपर्यंत नोंदणी केलेल्या १५ हजार ७६४ शेतकºयांच्या तुरीचा प्रश्न निर्माण झाला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करुन तूर खरेदीसाठी मुदतवाढीची गरज असल्याचे शासन व प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते. अखेर देशाचे कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी तूर खरेदीला मुदतवाढ दिली. हा निर्णय घेण्यास पाच दिवसांचा अवधी लागला. मुदतवाढीचे आदेश २३ रोजी सायंकाळी मिळाल्याने २४ रोजी काही केंद्रांवरच तूर खरेदी होऊ शकली. बुधवारपासून खरेदीला वेग येईल, मात्र पुरेसा बारदाणा आणि गोदामांची उपलब्धता आवश्यक आहे.मुदतवाढीत पाच दिवस वाया१८ एप्रिलपासून तूर खरेदी बंद केल्याने केंद्रचालक निवांत होते. तर तीन दिवस ताटकळलेल्या शेतकºयांनी त्यांचा माल परत घरी नेला. विस्कळीत झालेली यंत्रणा सुस्थितीत आणण्यात आली. मुदतवाढीमुळे पुन्हा तूर खरेदी सुरु होत आहे.जवळपास १६ हजार ९२५ शेतकºयांची तूर १५ मेपर्यंत खरेदी करण्याचे मोठे आव्हान यंत्रणांपुढे आहे. तूर खरेदी वेगाने झाल्यास हे आव्हान पेलता येणार असलेतरी केंद्र सुरु झाल्यापासून गोदाम उपलब्ध नसल्याने खरेदीची गती संथ राहिली आहे.केंद्रांच्या अडचणी१८ एप्रिलपर्यंत १ लाख ६८ हजार ५४४ क्विंटल तूर खरेदी झाली. त्यापैकी ९० हजार क्विंटल तूर गोदामाअभावी खरेदी केंद्रांवरच पडून आहे. मुदतवाढ मिळाली तरी खरेदी केलेली तूर कुठे ठेवायची असा पेच शिरुर, अंबाजोगाई, माजलगाव येथील केंद्र चालकांपुढे पडला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रBeedबीडagricultureशेती