शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पंकजा मुंडेंचे वर्चस्व असलेल्या वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष जैन यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 17:48 IST

बँकेचे मुख्य कार्यालय परळी येथे असून राज्यात एकूण 41 शाखा आहेत तर ठेवी 950 कोटीवर गेल्या आहेत. 

ठळक मुद्दे वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.नवीन अध्यक्षपदासाठी विनोद सामत यांचे नाव चर्चेत 

परळी : राज्यातील सहकारी बँकेत नावलौकिक मिळविलेल्या येथील दि वैद्यनाथ अर्बन को -ऑप. बँकेचे अध्यक्ष अशोक जैन यांनी आपल्या चेअरमन पदाचा गुरुवारी सायंकाळी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनामा दिला आहे. दहा वर्षापासून ते बँकेचे अध्यक्ष होते. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या या बँकेच्या नवीन अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे.

शहरातील व्यापारी, बँकेचे संस्थापक अध्यक्ष रतिलाल मोमया यांनी व्यापाऱ्यांना एकत्रित करून  वैद्यनाथ अर्बन बँकेची 1966 मध्ये स्थापना केली. त्यानंतर लोकनेते गोपीनाथराव मुंडे, अशोक सामत यांचे  कुशल नेतृत्व या बँकेस लाभले. बँकेचा शाखा विस्तार मराठवाड्यासह राज्यात  झाला. सध्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव, माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व  खासदार व बँकेच्या संचालक प्रीतम मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या या बँकेची दमदार प्रगती चालू आहे. बँकेचे मुख्य कार्यालय परळी येथे असून राज्यात एकूण 41 शाखा आहेत तर ठेवी 950 कोटीवर गेल्या आहेत. 

गेल्या अनेक वर्षापासून ही बँक भाजपच्या ताब्यात आहे. मुंडे परिवाराचे विश्वासू  अशोक जैन यांनी  11 जुलै रोजी 2011 रोजी अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली होती. अशोक जैन यांच्या चेअरमन पदाच्या काळात बँकेचा शाखा विस्तार झाला व  बँकेच्या ठेवी  950 कोटीपर्यंत गेल्या. वैद्यनाथ बँक प्रगतीकडे वाटचाल करीत असताना काहीजणांनी बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. गुरुवारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत जैन यांनी राजीनामा सादर केला. त्यानंतर बँकेच्या मार्गदर्शक पंकजा मुंडे यांची त्यांनी भेट घेतली. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षपदासाठी विनोद सामत यांचे नाव चर्चेत अशोक जैन यांच्या राजीनाम्यानंतर  वैद्यनाथ अर्बन बँकेच्या नवीन अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बँकेच्या अध्यक्षपदासाठी विनोद अशोक सामत यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हे विनोद सामत हे सध्या बँकेचे उपाध्यक्ष आहेत व बँकेचे माजी अध्यक्ष अशोक सामत  यांचे पुत्र आहेत .

बँकेच्या हितासाठी काम करत राहणारआपण वैयक्तिक कारणामुळे पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या दहा वर्षात सर्वांचे सहकार्य लाभले आहे. सर्व संचालकांनी वेळीवेळी सहकार्य केले. खातेदार ,सभासद यांनी विश्वास टाकल्यामुळे बँकेची प्रगती करू शकलो. यापुढेही आपण बँकेच्या हितासाठी काम करणार आहे. - अशोक जैन

टॅग्स :bankबँकPankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीड