बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राजकिशोर मोदी यांनी दणदणीत विजय संपादन केल्याबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व राजकिशोर मोदी मित्र मंडळाकडून अंबाजोगाई शहरातील प्रमुख चौकात फटाके फोडून, पेढेवाटप करून आपला आनंद व्यक्त केला.
यावेळी बीड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष गोविंद पोतंगले, अंबाजोगाई काँग्रेसचे तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने, नगरसेवक अमोल लोमटे, नगरसेवक सुनील व्यवहारे, माजी नगरसेवक गणेश मसने, माजी नगरसेवक सज्जन गाठाळ, राजकिशोर मोदी मित्र मंडळाचे प्रमुख माणिकराव वडवणकर, राणा चव्हाण, चेतन मोदी, रफिक गवळी, अकबर शेख, गालेब खान पठाण, सुदाम देवकर, अमोल मिसाळ आदींची उपस्थिती होती.