शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परळी जलयुक्त शिवार घोटाळा प्रकरणी तत्कालीन कृषी अधीक्षकाची होणार चौकशी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 12:20 IST

याप्रकरणाशी संबंधित २५ अधिकाऱ्यांसह तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक रमेश भताने यांची एका विशेष पथकाद्वारे चौकशी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे परळी तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानात ४ कोटी ८४ लाख रूपयांचा घोटाळा झाला.या प्रकरणाशी संबंधित कृषी विभागाच्या २४ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते.

बीड : परळी तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानात ४ कोटी ८४ लाख रूपयांचा घोटाळा झाला. याप्रकरणाशी संबंधित २५ अधिकाऱ्यांसह तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक रमेश भताने यांची एका विशेष पथकाद्वारे चौकशी करण्यात येणार आहे. ही माहिती महाराष्ट्र काँग्रेस ओ.बी.सी. विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाकडून कृषी आयुक्तांना एका पत्राद्वारे  विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार एका विशेष पथकाची नियुक्ती करुन घोटाळ्यातील तथ्य बाहेर काढण्यात येणार आहे.कृषी विभागाच्या पथकाने केलेल्या कामांच्या चौकशीत या प्रकरणात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे दिसून आले होते.

या प्रकरणाशी संबंधित कृषी विभागाच्या २४ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. चौकशी पथकाने शासनाकडे सोपवलेल्या अहवालावरून कृषी विभागाने रमेश भताने यांच्यासह सर्व दोषींची महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील नियम) नुसार चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य आयुक्त  कृषी आयुक्तालय, पुणे यांना दिले आहेत. या चौकशीनंतर जलयुक्त घोटाळ््यात आणखी काही बडे मासे गळाला लागतात का ? याकडे सगळ््यांचे लक्ष लागलेले आहे. 

पारदर्शक चौकशीसाठी झाली बदलीबीडचे तत्कालीन कृषी अधीक्षक रमेश भताने यांची बदली लातूर येथे विभागीय कृषी सहसंचालक या पदावर झाली होती. मात्र, या प्रकरणामध्ये भताने यांची चौकशी होणार असल्याचे संकेत मिळाल्याने त्यांची बदली नाशिक येथे विभागीय कृषी सहसंचालक पदावर करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारCorruptionभ्रष्टाचारState Governmentराज्य सरकार