शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

मिरा एखंडे मृत्यूप्रकरणी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 15:36 IST

येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रसूतीदरम्यान मीरा एखंडे या मातेचा नवजात बालकासह मृत्यू झाला होता.

माजलगाव (बीड ) : मीरा एखंडे व नवजात बालकाच्या प्रसूतीदरम्यान मृत्यू प्रकरणी दोषी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज सकाळी सर्वपक्षीय, संघटनांनी उपविभागीय कार्यालयावर मूक मोर्चा काढला. 

येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रसूतीदरम्यान मीरा एखंडे या मातेचा नवजात बालकासह मृत्यू झाला होता. हा मृत्यू  बेजबाबदारपणामुळेपणामुळे झाल्याचा आरोप करत सबंधित डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शहरातून आज सकाळी सर्वपक्षीय संघटनांनी मूक मोर्चा काढला.

हनुमान चौकातून निघालेल्या या मोर्चात शिवसेना, भारिप बहुजन महासंघ, संभाजी ब्रिगेड, रिपाई, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, मानवी हक्क अभियान, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवा संघटना, विविध विद्यार्थी संघटना आदींचा सहभाग होता. आंदोलकांनी उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांच्याकडे निवेदन सादर केले. विशेष म्हणजे या मूक मोर्चात मीरा एखंडे यांच्या सात मुली सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या सहभागाने अनेकांची अनेकांची मने हेलावली.

टॅग्स :agitationआंदोलनdoctorडॉक्टरBeedबीड