शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

मातोरीजवळ कार नाल्यात कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:42 IST

मृतांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचे नातेवाईक बीड : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार नाल्यात कोसळून कारमधील पती- पत्नी ठार झाले. ...

मृतांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचे नातेवाईक

बीड : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार नाल्यात कोसळून कारमधील पती- पत्नी ठार झाले. कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर शिरूर तालुक्यातील मातोरी परिसरात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात मयत झालेले दाम्पत्य हे भाजपाचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नातेवाईक असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहीण ममता तगलपल्लेवार व भाऊजी विलास तगलपल्लेवार हे त्यांच्या कारने (क्र. एमएच-२९ आर-४२३०) पुणे येथे मुलाला भेटण्यासाठी निघाले होते. दरम्यान कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर चकलांबा -तिंतरवणी दरम्यान मातोरी जवळ चालकाचा ताबा सुटल्याने कार नाल्यात जाऊन कोसळली. या अपघातात कारचा अक्षरशः चुरा झाला आहे. यामध्ये विलास तगलपल्लेवार (६२, रा. पुसद, जि. यवतमाळ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी ममता तगलपल्लेवार (५०) यांचा बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनास्थळी चकलांबा पोलीस ठाण्याचे फौजदार डिगांबर पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.

===Photopath===

240221\242_bed_36_24022021_14.jpeg

===Caption===

अपघात