शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

केजच्या शिक्षकांनी कोविड सेंटरला दिले ३ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST

दीपक नाईकवाडे केज : तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांनी ‘केज माझा तालुका, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत १५ दिवसांत ...

दीपक नाईकवाडे

केज : तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांनी ‘केज माझा तालुका, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत १५ दिवसांत चार लाख रूपये निधी संकलन करत बनसारोळा येथील कोविड केअर सेंटरला ३ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसह इतर आवश्यक साहित्याची भेट दिली. सद्य:स्थितीत तालुक्याची गरज लक्षात घेत या उपक्रमातून शिक्षकांनी सामाजिक बांधीलकी जपली.

ठिकठिकाणी कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना अडचणी येतात. ही बाब ओळखून केज तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांनी ‘केज माझा तालुका, माझी जबाबदारी’ हा उपक्रम स्वेच्छेने राबवला. यास तालुक्यातील शिक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अवघ्या १५ दिवसांत ३०९ शिक्षकांनी ३ लाख ९६ हजार १९१ रुपयांचा निधी स्वेच्छेने जमा केला. या निधीतून ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी ५ पल्स ऑक्सिमीटर, १० लीटर सॅनिटायझर, सॅनिटायझरच्या २० छोट्या बॉटल, २० नग एन-९५ मास्क तसेच कोविड केअर सेंटरमध्ये योगा, व्यायामाच्या ठिकाणी म्युझिक सिस्टीम आदी साहित्य खरेदी केले. ते तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास आठवले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालासाहेब सोळंके, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांच्या हस्ते सुपूर्द केले.

तालुक्यातील बनसारोळा येथील कोविड केअर सेंटरला दोन तर मानवलोक कोविड केअर सेंटर अंबाजोगाई येथे एक अशा वातावरणातील ऑक्सिजन वेगळे करून त्याचा पुरवठा करणाऱ्या तीन मशीन भेट देण्यात आल्या. केज तालुक्यातील जिल्हा परिषदेचे शिक्षक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही मागील १४ महिन्यांपासून प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडत आहेत. या उपक्रमाद्वारे निधी संकलनासाठी संकेत डोंगरे, विष्णू यादव, राहुल काकनाळे, महादेव ढाकणे, बाबासाहेब केदार, राहुल उंडाळे, युवराज हिरवे, किशोर भालेराव, श्रीमंत भोसले, बाळासाहेब चव्हाण, बाळासाहेब गोरे, बाबासाहेब सारुख, बबन राऊत, किसन लोंढे , अरुण पवार यांनी प्रयत्न केले.

यावेळी उपजिल्हा रुग्णालय केजचे वैद्यकीय अधिकारी डॉ. केशव इंगळे, डॉ. करपे, डॉ. सावंत, श्रीकृष्ण नागरगोजे, सह विक्रम डोईफोडे, सुरेश काळे, अर्जुन बोराडे, उद्धवजी थोरात, शृंगारे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आश्रुबा सोनवणे यांनी केले. राहुल काकनाळे यांनी आभार मानले.

===Photopath===

290521\0056deepak naikwade_img-20210529-wa0064_14.jpg