शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

केज मतदार संघाला विकासाचे ‘मॉडेल’ करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:32 IST

केज मतदार संघाला विकासाचे मॉडेल बनविण्याची ग्वाही अशी ग्वाही केज विधानसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांनी दिली.

ठळक मुद्देमुंदडा यांचा मतदारांशी संवाद : विविध ठिकाणी प्रचार सभांतून जनसेवेची दिली ग्वाही

अंबाजोगाई : राजकारणात मी नवीन नाही तर गेल्या पाच वर्षांपासून मतदारसंघात सक्रियपणे कार्यरत आहे. मतदार संघाचे सर्व प्रश्न व समस्या मला पूर्णत: ज्ञात आहेत. त्या समस्या मार्गी लावून मतदार संघाची विकासात्मक वेगळी ओळख आपण निर्माण करणार आहोत, केज मतदार संघाला विकासाचे मॉडेल बनविण्याची ग्वाही अशी ग्वाही केज विधानसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांनी दिली.केज तालुक्यात विविध ठिकाणी नमिता मुंदडा यानी सभांमधून मतदारांना आवाहन केले. तसेच कॉर्नर बैठकांमधून मतदारांशी संवाद साधला. नमिता मुंदडा म्हणाल्या, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना नव्याने आलेल्या नेत्यांनी आम्हाला मोठा त्रास दिला. राजकारणातून आम्हाला संपविण्याची भाषा होऊ लागली. तरीही आम्ही जनतेच्या पाठबळावर खंबीर उभे राहून लोकांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत होतो. मात्र, पक्षविरोधी कारवायांना कंटाळून आपण भाजपामध्ये प्रवेश केला. पंकजा मुंडे व डॉ. प्रीतम मुंडे यांचे सक्षम नेतृत्व स्वीकारले. मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरून काढणार आहोत. रात्रंदिवस तुमच्या सेवेसाठी मी तत्पर राहीन. तुम्ही मला संधी द्या, असे आवाहन नमिता मुंदडा यांनी ठिकठिकाणच्या सभांमधून व बैठकांमधून केले.वॉटरग्रीडच्या माध्यमातून मांजरा धरणात पाण्याची व्यवस्था- अक्षय मुंदडापंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याचा समावेश वॉटरग्रीडमध्ये करण्याचे ठरविले आहे. शासनाने या योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.आगामी काळात उजनी धरणातून मांजरा धरणात पाणी आणण्याची व्यवस्था वॉटरग्रीडच्या माध्यमातून करणार असल्याची ग्वाही अक्षय मुंदडा यांनी ठिकठिकाणी झालेल्या सभांमधून दिली. पंकजा मुंडे यांचे नेतृत्व हे विकास साध्य करणारे नेतृत्व आहे. या पाठबळावरच केज मतदार संघाचा विकासात्मक कायापालट करणार असल्याचे अक्षय मुंदडा म्हणाले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा