शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

केज, परळी, नेकनूर आरोग्य संस्थेने गाठले ‘लक्ष्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 00:04 IST

प्रसुतीचा वाढता टक्का आणि महिला व प्रसुतीसंदर्भातील सुविधांचा आढावा घेतल्यानंतर बीड जिल्ह्यातील तीन आरोग्य संस्थांनी ‘लक्ष्य’ या योजनेत प्रमाणपत्र पटकावले आहे.

ठळक मुद्देयशस्वी वाटचाल : बीड सिव्हील व गेवराई उपजिल्हा रुग्णालयाची तपासणी बाकी

बीड : प्रसुतीचा वाढता टक्का आणि महिला व प्रसुतीसंदर्भातील सुविधांचा आढावा घेतल्यानंतर बीड जिल्ह्यातील तीन आरोग्य संस्थांनी ‘लक्ष्य’ या योजनेत प्रमाणपत्र पटकावले आहे. नेकनूर स्त्री रुग्णालयासह केज व परळी उपजिल्हा रुग्णालयांचा यामध्ये समावेश आहे. तसेच बीड जिल्हा रुग्णालय आणि गेवराई उपजिल्हा रुग्णायालयाची तपासणी बाकी असून त्यांनीही प्रमाणपत्रासाठी कंबर कसली आहे.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात आरोग्य विभागाने विविध योजना आणि उपक्रमांमध्ये मान उंचावली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार यांच्या समन्वयाचा सन्मानही आयुक्त अनुपकुमार यादव यांनी नुकताच केला आहे. कायाकल्पमध्ये यश पटकावल्यानंतर बीड जिल्ह्यातील बीड जिल्हा रुग्णालय, नेकनूर स्त्री रुग्णालयासह केज, परळी आणि गेवराई उपजिल्हा रुग्णालयाने लक्ष्य या उपक्रमात सहभाग नोंदविला होता. जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील समितीने तपासणी केल्यानंतर परळी, केज उपजिल्हा रुग्णालय आणि नेकनूर स्त्री रुग्णालयाला यशस्वी झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. आता केवळ जिल्हा रुग्णालय आणि गेवराई उपजिल्हा रुग्णायालयाची तपासणी राष्ट्रीय समितीकडून बाकी असून त्यादृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत.दरम्यान, हे प्रमाणपत्र पटकावणाऱ्यांना निधी स्वरूपात बक्षीस दिले जाते. उपजिल्हा, स्त्री आणि ग्रामीण रुग्णालयांना दोन लाख रुपयांचा निधी दिला जातो. तर जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांना तीन लाख रुपयांचा निधी दिला जातो. हा निधी पटकाविण्यासह कारभार सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्ति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाबासाहेब ढाकणे यांच्यासह सर्व वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारीका यासाठी परिश्रम घेत आहेत.अंबाजोगाई एसआरटी, माजलगाव रुग्णालयाचा सहभागगतवर्षी पाच संस्थांची निवड झाल्यानंतर यावर्षी अंबाजोगाईचे स्वाराती रुग्णालय आणि माजलगाव ग्रामीण रुग्णालयाने यात सहभाग नोंदविला आहे. या दोन्ही रुग्णालयात महिला व मातांच्या दृष्टीने सुविधा पुरविल्या जातात. तसेच प्रसुतीचा आकडाही मोठ्या प्रमाणात आहे. हे दोन्ही रुग्णालय प्रमाणपत्र पटकावण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीड