शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कॅब, एनआरसी धोरणाविरुद्ध अंबाजोगाई शहरात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 01:09 IST

भारतीय संविधान मानणा-या नागरीकांकडून केंद्र सरकारच्या जुलमी व असंवैधानिक धोरणांविरूध्द तसेच महाराष्ट्र शासनाने मुस्लिम समाजास ५ टक्के आरक्षण द्यावे, या मागण्यांसाठी मंगळवारी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : भारतीय संविधान मानणा-या नागरीकांकडून केंद्र सरकारच्या जुलमी व असंवैधानिक धोरणांविरूध्द तसेच महाराष्ट्र शासनाने मुस्लिम समाजास ५ टक्के आरक्षण द्यावे, या मागण्यांसाठी मंगळवारी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.शहरातील बाराभाई गल्ली येथून निघालेला मोर्चा पाटील चौक, सावरकर चौक, बस स्थानक, शिवाजी चौक मार्गाने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. मोर्चात अंबाजोगाईतील भारतीय संविधान मानणा-या संघटना सहभागी झाल्या होत्या.भारतीय संविधानातील धर्मिनरपेक्ष तत्वाच्या धार्मिक आधारावर दिले जाणारे नागरिकत्वाच्या (कॅब) विरु द्ध तसेच आगामी काळात भारतात काळा कायदा (एनआरसी) धोरणांविरूद्ध व महाराष्ट्रातील मुस्लिम समाजास ५ टक्के आरक्षण मिळावे. केंद्रातील भाजप सरकारने नुकतेच संसदेमध्ये पारित केलेल्या नागरीकता संशोधन विधेयकातील मसुदा भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेविरुद्ध असून भारताच्या एकता व अखंडतेच्या विरूद्ध असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रातील मुस्लिम समाजास सच्चर आयोग,महेमूद रहेमान समिती व कुंडू आयोगाच्या शिफारशी आणि उच्च न्यायालयाने पारित केलेल्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणीही करण्यात आली.

टॅग्स :Morchaमोर्चाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकagitationआंदोलन