शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर धावली बर्निंग ट्रक !

By admin | Updated: April 27, 2017 20:07 IST

पेटता ट्रक आगीचे लोळ घेऊन जवळपास एक किलोमीटर महामार्गावरून धावला आणि एखाद्या चित्रपटातील थरारक दष्य पाहून लोकांच्या काळजाचा ठोका चुकला

ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 27 -  जनावरांसाठीचा कङबा घेऊन जाणारा पेटता ट्रक आगीचे लोळ घेऊन जवळपास  एक किलोमीटर महामार्गावरून धावला आणि एखाद्या चित्रपटातील थरारक दष्य पाहून लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. गुरूवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान चौसाळा गावानजिक हा प्रकार घडला.
 
महामार्गावर महावितरणच्या लोंबकळत असलेल्या तारा एकमेकांवर घासल्याने त्याच्या ठिणग्या उडाल्या आणि त्या नेमक्या कडबा घेऊन जाणाºया ट्रकवर  (ट्रक क्रमांक एम.एच. ०९ २७५९) उडाल्या. परंतु ही गोष्ट चालकाच्या लक्षातच आली नाही. कडब्याने काही मिनिटातच पेट घेतला आणि आगीच्या ज्वाळा ट्रकमधून निघू लागल्या. तरीही जवळपास एककिलोमीटर हा ट्रक धावतच राहिला. चालक दीपक जोगदंड याला साईड आरशातून जेव्हा ट्रकने पेट घेतल्याचे दिसले तेव्हा त्याचेही धाबे दणाणले. परंतु समयसुचकता दाखवत त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या वाशिंग सेंटरवर ही गाडी आणली आणि त्यानंतर पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्यात आली.