शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीत भर दिवसा घरफोडी; दिड लाख रुपयांसह दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 19:19 IST

आष्टी शहरात पहाटे आणि भर दुपारी दोन घरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला

ठळक मुद्दे पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरीचे सञ सुरूच

कडा ( बीड ) : घरात कोणीच नसल्याचा डाव साधून आष्टी येथील पंचायत समितीसमोरील भागातील एका घरात सोमवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रा.नवनाथ विधाते यांच्या घराचे कुलूप तोडून ही चोरी झाली असून चोरट्यांनी १ लाख ४० हजाराची रोख रक्कम आणि एक तोळे सोनं लंपास केले. 

याबाबत आष्टी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील मुर्शदपूर भागात प्रा.नवनाथ विधाते यांचे घर आहे. त्यांच्या घरातील सर्व सदस्य आज मुळगावी नांदूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी विधाते यांच्या घराचे कुलूप तोडून आता प्रवेश केला. घरातील १ लाख ४० हजार रोख रक्कम आणि एक तोळ्याची सोन्याची चैन चोरली. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. 

पहाटे सुद्धा फोडले एक घर आष्टी शहरातील सायकड गल्ली येथील आर.सी.खुळपे या शिक्षकाच्या घरीही कोणी नसल्याची संधी साधून सोमवारी पहाटे चोरट्यांनी चोरी केली. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी जवळपास तीन तोळं सोने आणि दहा हजार रूपये रोख ऐवेज लंपास केला आहे. या दोन्ही घटनास्थळावर पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे, पो.ना.मच्छिंद्र उबाळे, अमोल ढवळे यांनी पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीड