शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये सराफा व्यापाऱ्यास गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:19 IST

व्यापारी म्हणून आलेल्या इसमाने सोन्याची लगड असल्याचे सांगून शहरातील एका सराफा व्यापा-याला जवळपास दीड लाखाला गंडा घातल्याची घटना मंगळवारी सायंकाळी बीडमध्ये घडली.

ठळक मुद्देदीड लाखाला फसविले। व्यापा-याने दिलेली सोन्याची लगड निघाली मिश्रधातूंची बांधीव

बीड : व्यापारी म्हणून आलेल्या इसमाने सोन्याची लगड असल्याचे सांगून शहरातील एका सराफा व्यापा-याला जवळपास दीड लाखाला गंडा घातल्याची घटना मंगळवारी सायंकाळी बीडमध्ये घडली. विकत घेतलेली लगड सोन्याची नसून इतर धातुची असल्याचे गुरुवारी लक्षात आल्यानंतर सदर व्यापाºयाला धोका झाल्याचे स्पष्ट झाले.बीड शहरातील सुभाष रोडलगत असलेल्या कबाड गल्ली भागातील श्रीहरी सुवर्णकार दुकानात मंगळवारी सायंकाळी एक इसम हातात बॅग घेऊन आला. आपले नाव राजेश असून स्वत:ला सोन्याचा व्यापारी असल्याचे व हिंगोली येथून आल्याचे सांगून दुकान मालक श्रीहरी मैड यांना बोलते केले. त्यानंतर बाजारातील इतर काही सराफ्यांची नावे सांगून बॅगमधील चार इंची लांब लगड काढून दाखविली आणि आपल्याला एका सराफा व्यापाºयाने दिली असून पेमेंटची गरज असल्याने विकायची असल्याचे सांगितले.सराफा बाजारात राजेश नामक एक व्यापारी येत असतो. तसेच बीडमधील काही सराफ्यांची नावे त्याने सांगितल्यामुळे विश्वास ठेवत श्रीहरी मैड यांनी सोन्याची लगड तपासणीसाठी घेतली. एका बाजूने लगड कट करुन खात्री केली असता सोने असल्याचे निदर्शनास आल्याने त्याचे वजन केले. जवळपास ४३ ग्रॅम १९० मिली सोन्याच्या लगड खरेदी करत त्याचे १ लाख ४२ हजार ६२७ रुपयांचे पेमेंट सदर व्यापा-याला दिले.बुधवारी साप्ताहिक बंद असल्याने गुरुवारी मैड यांनी नेहमीप्रमाणे कामकाज सुरु केले. मंगळवारी राजेश नामक व्यापाºयाकडून खरेदी केलेली लगड मधोमध कट केली असता काहीतरी काळेबेरे असल्याचे दिसून येताच मैड यांना धक्का बसला. आपली मोठी फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर सराफा व्यापारी बांधवांच्या सोशल मीडिया ग्रुपवर हा प्रकार कळविला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणा-या भामट्याचे फोटोदेखील बीडसह औरंगाबाद, परभणील नांदेड भागातील सहमित्रांच्या ग्रुपवर व्हायरल केले. मात्र, त्या भामट्याचा सुगावा लागला नाही. हा प्रकार दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे सांगून अद्याप पोलिसात तक्रार दिली नसल्याचे सराफा व्यापारी श्रीहरी मैड यांनी सांगितले.शहरातील ८ ते १० व्यापाऱ्यांचीही झाली यापूर्वी फसवणूकसोन्याची लगड खरेदी करताना खात्री करण्यासाठी सराफा व्यापारी लगडची एक बाजू कट करतात.नेमकी ही पद्धत लक्षात घेत भामट्याने विकलेल्या लगडच्या दोन्ही बाजूला थोडे सोने दिसेल अशी चलाखी केलेली होती.श्रीहरी मैड यांनी एका बाजूने कट केल्याने फसवेगिरी त्यांच्या लक्षात आली नाही.दागिन्यांतूनही होते सराफांची फसवणूकयेणारे व्यापारी त्यांच्याकडील विविध डिझाइन्सचे सोन्याचे लॉकेट दाखवतात.मात्र लॉकेटच्या दोन्ही बाजुने असलेल्या कड्या सोन्याच्या असतातइतर भाग बांधीव असतो, त्यावर सोन्याचे आवरण असते.त्यामुळे पूर्ण लॉकेट सोन्याचे असल्याचे भासते.

टॅग्स :BeedबीडfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी