संजय तिपाले , बीडनिर्मलग्राम पुरस्कारासाठी १०० टक्के कुटुंबियांकडे शौचालये असणे बंधनकारक आहे;परंतु शौचालयांची कामे अपूर्ण असतानाही ९ गावांची पुरस्कारासाठी निवड झाली़ गावावर कौतुकाचा वर्षाव होत असला तरी नाचक्की होऊ नये, यासाठी आता प्रशासनासह गावकरीही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी जोमाने कामाला लागले आहेत़ यानिमित्ताने निर्मलग्राम पुरस्कार मिळविणाऱ्या गावांमधील वस्तूस्थिती पुढे आली आहे़चांद्यापासून बांध्यापर्यंत सध्या हागणदारीमुक्तीचा बोलबाला आहे़ या योजनेंतर्गत वैयक्तिक शौचलय बांधकामासाठी पूर्वी ४ हजार ६०० रुपये इतके अनुदान दिले जायचे आता त्यात १२ हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे़ पुरस्कारप्राप्त गावांनाही लोकसंख्येनुसार रोख पारितोषिक देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविले जाते़ घरोघर नळजोडणी असल्यास बोनस रक्कमही देण्याची तरतूद आहे़ जिल्ह्यात २०१४-१५ मध्ये १२ ग्रामपंचायतींनी योजनेत सहभाग नोंदविला होता़ विभागीय तपासणीत सर्वच्या सर्व गावे पात्र ठरविण्यात आली़ नंतर राज्यस्तरीय पथकाकाने तीन गावे अपात्र ठरली़ उर्वरित ९ गावे निर्मलग्राम पुरस्कारासाठी महिन्यापूर्वी पात्र ठरवली़ प्रत्यक्षात या गावांमधील शौचालयाची कामे पूर्ण नाहीत़ त्यामुळे तेथील ग्रामस्थांना पाणंदीला गेल्याशिवाय पर्याय नाही़ सीईओंनी दिली ‘डेडलाईन’!पुरस्कारासाठी निवड झालेल्या ९ गावांमधील खरे चित्र पुढे आल्यावर ‘छी-थू’ होऊ नये यासाठी आता शौचालयांची अपूर्ण कामे जानेवारीअखेर पूर्ण करा, असे फर्मान सीईओ नामदेव ननावरे यांनी पाणी व स्वच्छता विभागाला सोडले आहेत़जिल्हा पुढे आणूसीईओ नामदेव ननावरे म्हणाले, पुरस्कार जाहीर झालेल्या गावांमध्ये शंभर टक्के शौचालये बांधण्यात येतील़ जिल्हा शौचालय बांधणीत तळाशी आहे़ येणाऱ्या काळात मोहीम गतिमान करण्यात येईल़
शौचालय बांधणीसाठी जि़प़चे वरातीमागून घोडे!
By admin | Updated: January 15, 2015 00:11 IST