शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

निर्घृणपणे गळा चिरुन तरुणाची हत्या; पाय बांधून मृतदेह फेकला तलावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 12:15 IST

तलावाच्या किनाऱ्यास सिरसाळा- बीड रस्त्याच्या उत्तरेस काही गुराख्यांना एक मृतदेह तलावाच्या आढळला.

बीड /सिरसाळा: परळी तालुक्यातील वांगी शिवारातील तलावात अनोळखी तरुणाचा मृतदेह १ डिसेंबर रोजी आढळून आला होता. दरम्यान, धारदार शस्त्राने गळा चिरुन त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर पाय दोरीने बांधून मृतदेह तलावात फेकण्यात आला होता. २ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता अज्ञात आरोपीवर सिरसाळा ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. हत्येचे गूढ कायम आहे.

१ डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता वांगी (ता.परळी) येथील तलावाच्या किनाऱ्यास सिरसाळा- बीड रस्त्याच्या उत्तरेस काही गुराख्यांना एक मृतदेह तलावाच्या आढळला. नानकराम रावत (२७,रा.घोडीबुजूला, मध्यप्रदेश, हमु.सिरसाळा) या गुराख्याने याची माहिती तातडीने सिरसाळा पोलिसांना कळवली. सहायक निरीक्षक प्रदीप एकशिंगे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन अहवालात त्याचा खून झाला असल्याचे निष्पन्न झाले. पो.ना.तुषार गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात मारेकऱ्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. सहायक निरीक्षक प्रदीप एकशिंगे तपास करत आहेत.

मृताची ओळख पटविणे सुरुमृताचे वय अंदाजे ३५ ते ४० असून त्याची ओळख पटलेली नाही. तीन ते चार दिवसांपासून मृतदेह पाण्यात असल्याने परिसरात दुर्गंधी सुटली होती. पँटच्या खिशाच्या आतील बाजूस पेनाने संतोष असे लिहिलेले आढळले. त्याच्या डाव्या कानाजवळ धारदार शस्त्राने वार केलेला असून गळा चिरलेला आहे. दोन्ही पाय घोट्याजवळ दोरीने बांधलेले आहेत. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरु असून खुनामागचे कारण गुलदस्त्यात असल्याचे सहायक निरीक्षक प्रदीप एकशिेंगे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड