शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

रुग्णाच्या नातेवाईकांकडून ब्रदरला मारहाण;बीड जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 22:41 IST

रुग्णालयाला आले छावणीचे स्वरूप

बीड : जिल्हा रुग्णालयात अपघात झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी आक्रमकपणा घेत ब्रदरला मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेनंतर कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. रुग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.

आमेर शेख (वय ३०, रा. बीड) असे मयताचे नाव आहे. शनिवारी रात्री ८ वाजता अपघात झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी आक्रमकपणा घेत कर्तव्यावर असलेल्या रतन बडे या ब्रदरला मारहाण केली. टेबल फेकून देत कागदपत्रेही फाडली. ही घटना समजताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी रुग्णालय गाठले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. उप अधीक्षक भास्कर सावंत, पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे हे फौजफाट्यासह रुग्णालयात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत जिल्हा रुग्णालयात तणाव होता.

दरम्यान, मारहाणीची घटना घडल्यानंतर सर्व परिचारिका व कर्मचारी, डॉक्टर एकत्रित आले. त्यांनी घटनेचा निषेध नोंदवित कामबंद आंदोलन पुकारत कडक कारवाईची मागणी केली. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. बाबासाहेब ढाकणे, परिचारिका संगीता  दिंडकर, शीला मुंडे, संगीता सिरसाट, स्वाती माळी, संगीता क्षीरसागर यांच्यासह डॉक्टर, परिचारिका, सेवक यांची उपस्थिती होती.

रुग्णायाला कडेकोट बंदोबस्तमारहाणीच्या घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठा जमाव जमला होता. त्यानंतर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे रुग्णालयाला छावणीचे स्वरुप होते. रात्री उशिरापर्यंत हा तणाव कायम होता.

पोलिसांसमोरच मारहाण झाल्याने संतापमयत हा निवृत्त पोलीस कर्मचाºयाचा मुलगा असल्याचे समजते. त्यांचा अपघात होताच पोलीस बॉईज व कर्मचारी मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले. घटनेची माहिती समजताच नातेवाईकांनी ब्रदरला मारहाण केली. यावेळी जवळपास १० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

काय आहे नातेवाईकांचा आरोप ?आमेर शेख यांना रुग्णालयात दाखल केले तेव्हा ते जिवंत होते. त्यांच्यावर उपचारही करण्यात आले. त्यानंतर काही वेळांनी त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर आणि कर्मचाºयांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत त्यांनी मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात गोंधळ कायम होता.

रुग्णालयातील प्रकाराबद्दल माहिती समजताच आलो. डॉक्टर, कर्मचाºयांची चूक असेल तर खात्यांतर्गत चौकशी करुन कारवाई केली जाईल. कर्मचाºयांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलन करु नये म्हणून त्यांना विनंती केली जात आहे. रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून डॉक्टर, सीएचओंना वॉर्डमध्ये थांबण्याचे आदेश दिले आहेत.- डॉ. अशोक थोरात,जिल्हा शल्य चिकित्सक

टॅग्स :Beed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडhospitalहॉस्पिटलBeedबीड