शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवरीचा मामा म्हणून मिरवला अन् कोरोना पॉझिटिव्ह निघाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 19:15 IST

गावात दक्षता समिती असूनही हा प्रकार घडल्याने समितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देविनापरवानगी लग्न लावणे पडले महागात  बीड जिल्ह्यात वधूपिता, मामासह वऱ्हाडींवर गुन्हा दाखल 

बीड : आष्टी तालुक्यातील कारखेल येथे विनापरवानगी आणि ५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी जमवून विवाह लावल्याप्रकरणी वधूपित्यासह मामा व इतर वºहाडी मंडळींवर अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. २९ जून रोजी झालेल्या या विवाहाची माहिती ५ जुलै रोजी प्रशासनाला समजली. यावरून प्रशासन किती गाफिल आहे, याची प्रचिती येते. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करताना हा प्रकार समोर आला आणि प्रशासन खडबडून जागे झाले. 

पनवेल येथून एक जण कारखेल येथे आला होता. आल्यानंतर त्याने क्वारंटाईन राहणे बंधनकारक होते. परंतु तो अहमदनगरला गेला. नंतर कारखेल येथीलच आपल्या भाचीच्या लग्नात उपस्थित राहिला. नंतर तो दोन दिवसांनी पॉझिटिव्ह आला. नवरीचा मामा असल्याने तो सर्वत्र मिरवल्याने अनेकांशी त्याचा संपर्क आला. हा विवाह देखील विनापरवानगी लावल्याचे चौकशीतून समोर आले.  त्यामुळे वधूपित्यासह मामा व इतर वºहाडी मंडळीवर ग्रामसेवक अशोक खाकाळ यांच्या फिर्यादीवरून अंभोरा ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. गावात दक्षता समिती असूनही हा प्रकार घडल्याने समितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सर्व प्रकारावरून ग्रामसेवकांचेही गावात लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. 

मामावर होम क्वारंटाईन नियम तोडल्याचा गुन्हापनवेलहून आल्यानंतर होम क्वारंटाईन न राहता सर्वत्र फिरून इतर लोकांशी संपर्क केल्याने वधूचा मामा आणि नगर येथे पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णावर वेगळा गुन्हा नोंद केला आहे. यातही खाकाळ हेच फिर्यादी आहेत. २९ तारखेला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित लोकांमध्ये विवाह झाल्याची माहिती समितीला नसणे, हे संशयास्पद आहे. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगने दक्षता समिती व ग्रामसेवकाच्या कारभाराचा पर्दाफाश केला. प्रत्येक गावात दक्षता समिती तयार केली आहे. ५ जुलै रोजी आपल्याला माहिती समजल्याचे ग्रामसेवकांनी फिर्यादीत नमूद केले आहे. २९ जून ते ५ जुलै दरम्यान हा प्रकार का समोर आला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड