शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाच प्रकरण; हवालदाराला कोठडीबाहेर ठेवून उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:48 IST

लाच प्रकरणात अटक केलेल्या पोलीस हवालदाराला न्यायालयीन कोठडी मिळाली. नंतर छातीत दुखू लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे कोठडीत उपचार न करता सर्वसामान्य रुग्णाप्रमाणे कोठडीबाहेर उपचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी समोर आला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लाच प्रकरणात अटक केलेल्या पोलीस हवालदाराला न्यायालयीन कोठडी मिळाली. नंतर छातीत दुखू लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे कोठडीत उपचार न करता सर्वसामान्य रुग्णाप्रमाणे कोठडीबाहेर उपचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी समोर आला आहे. नियमानुसार कोठडीबाहेर आरोपीवर उपचार करणे धोक्याचे ठरू शकते. विशेष म्हणजे एक आरोपी कोठडीत तर दुसरा बाहेर असा प्रकार समोर आला. या निमित्ताने बीड पोलिसांचा दुजाभाव चव्हाट्यावर आला आहे.बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील हवालदार शंकर राठोड यांना १० हजार रुपयांची लाच घेताना दोन दिवसांपूर्वी जालना एसीबीने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर कारागृहात पाठविण्यात आले होते. रविवारी राठोड यांच्या छातीत दुखू लागल्याने सायंकाळी पाच वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल केले. बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारीही ठेवण्यात आला. मात्र, राठोड यांना कोठडीत ठेवून उपचार करण्याऐवजी संबंधित पोलिसाने बाहेर काढले. हा प्रकार माध्यमांनी समोर आणल्यानंतर आरोग्य व पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली.बीड शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पगार म्हणाले, कोठडीबाहेर उपचार करता येत नाहीत. येथील सुरक्षारक्षकाची ही जबाबदारी आहे. गैरप्रकार घडल्यास अंगलट येऊ शकते. याची माहिती घेतली जाईल.एक आरोपी कोठडीत, दुसऱ्याला बाहेर का?एरव्ही आरोपीला भेटू न देणारे पोलीस या प्रकरणात मात्र शिथील झाल्याचे दिसले. एका आरोपीवर कोठडीत उपचार केले जात होते तर दुस-याला बाहेर.आरोपी हा आरोपीच असतो. मात्र पोलिसांनी येथे दुजाभाव केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. आता यावर कारवाई होते की, हे प्रकरण पोलीस असल्याने पुन्हा दडपले जाते, याकडे लक्ष लागले आहे.वॉर्डमध्ये काय चालते, हे प्रमुखांना माहिती असणे आवश्यक आहे. प्रमुख डॉ. बाळासाहेब टाक यांना विचारले असता ते म्हणाले, बाहेर ठेवून उपचार करण्यात इतपत त्यांची प्रकृती गंभीर नव्हती. मी उपचार केले तेव्हा आरोपी बाहेरच होता. अ‍ॅडमिट झाल्यापासून तो कोठे आहे, याबाबत मला माहिती नाही. विचारून सांगतो, असे ते म्हणाले. मात्र उशिरापर्यंत त्यांनी कसलीच माहिती दिली नाही. यावरून डॉ. टाक हे सुद्धा संशयाच्या भोवºयात अडकले आहेत. त्यांनी हा प्रकार वरिष्ठांच्या कानावर घालणे गरजेचे होते, मात्र त्यांनी हे लपवल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCorruptionभ्रष्टाचारhospitalहॉस्पिटल