शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
5
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
6
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
7
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
8
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
9
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
11
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
12
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
13
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
14
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
15
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
16
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
17
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
18
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
19
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
20
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...

बीडमध्ये ट्रकचे टायर चोरणा-या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:46 IST

महामार्गालगत उभा असलेल्या ट्रकचे टायर चोरणाºया टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टोळीचा म्होरक्या शेख इलियास शेख इसाक (२५ रा.बालेपीर) याला गजाआड करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी नगर रोडवरील बालेपीर भागात करण्यात आली. त्यांच्याकडून एका पिकअप वाहनासह दोन लाख रुपये किंमतीचे टायरही जप्त केले आहेत.

ठळक मुद्देदोन लाखांच्या टायरसह पिकअप जप्त; तीन गुन्हे उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : महामार्गालगत उभा असलेल्या ट्रकचे टायर चोरणाºया टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टोळीचा म्होरक्या शेख इलियास शेख इसाक (२५ रा.बालेपीर) याला गजाआड करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी नगर रोडवरील बालेपीर भागात करण्यात आली. त्यांच्याकडून एका पिकअप वाहनासह दोन लाख रुपये किंमतीचे टायरही जप्त केले आहेत.

पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या सुचनेवरून सध्या शहरात गस्त वाढविण्यात आली आहे. रविवारी पहाटेही वाहतूक शाखेचे पथक गस्त घालत होते. याचवेळी बालेपीर भागात त्यांना एका पीकअपमधून टायर घेऊन जाणारे पिकअप दिसले. त्यांनी हटकले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावला. चौकशी करीत असतानाच पिकअपमधील चोरट्यांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला, मात्र ते मिळून आले नाहीत.

रविवारी दिवसभर या चोरट्यांचा शोध घेण्यात आला. सायंकाळच्या सुमारास शेख इलियास हा त्याच्या घरी लपल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून इतर आरोपींची माहिती घेतली जात असून त्याचे साथिदार हे शेजारील जिल्ह्याचे असल्याचे सांगण्यात आले. पोलीस पथक त्यांच्या मागावर आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिलीप तेजनकर, तुळशीराम जगताप, शेख नसीर, प्रसाद कदम, सतीश कातखडे, नरेंद्र बांगर आदींनी कारवाईत सहभाग घेतला.त्या चार कर्मचाºयांचा होणार सत्कारगस्तीदरम्यान वाहन पकडणाºया वाहतूक शाखेच्या रविंद्र नागरगोजे, मच्छिंद्र कप्पे, नितीन काकडे, महादेव बाबासाहेब सानप या चार कर्मचाºयांचा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

इलियासला टायरची माहितीपोलिसांनी ताब्यात घेतलेला शेख इलियास हा पूर्वी हैदराबाद येथील आॅईलच्या कंपनीत होता. याठिकाणी टायर जाळून आॅईल काढले जात होते. त्यामुळे त्याला टायरची सर्व माहिती होती.यामध्ये भरपूर पैसा असल्याचे त्याला माहिती होते. त्यामुळेच त्याने इतर साथिदारांच्या सहाय्याने टायर चोरीचा व्यवसाय निवडला.