शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

जनजागृतीमुळे एचआयव्ही संसर्गाला बीड जिल्ह्यात ‘ब्रेक’; टक्का नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:00 IST

एचआयव्ही म्हटले की, माणूस दोन पावले मागे सरकतो. हा आजार जडलेल्या व्यक्तीला उपेक्षेच्या दृष्टीने पाहिले जाते; परंतु समाजाच्या दृष्टीत या रुग्णांना मानसन्मान देण्याबरोबरच एड्सग्रस्तांची जिल्ह्यातील टक्केवारी कमी करण्यासाठी आरोग्य विभागाला यश येत आहे. प्रभावी जनजागृती, समुपदेशन व उपाययोजना हेच टक्केवारी घसरण्याचे मुख्य उपचार ठरले. एचआयव्ही संसर्गाची आठ वर्षांपूर्वी ५.५ असणारी टक्केवारी आता ०.७७ पर्यंत आली असून, तिची शून्याकडे वाटचाल सुरु आहे.

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : एचआयव्ही म्हटले की, माणूस दोन पावले मागे सरकतो. हा आजार जडलेल्या व्यक्तीला उपेक्षेच्या दृष्टीने पाहिले जाते; परंतु समाजाच्या दृष्टीत या रुग्णांना मानसन्मान देण्याबरोबरच एड्सग्रस्तांची जिल्ह्यातील टक्केवारी कमी करण्यासाठी आरोग्य विभागाला यश येत आहे. प्रभावी जनजागृती, समुपदेशन व उपाययोजना हेच टक्केवारी घसरण्याचे मुख्य उपचार ठरले. एचआयव्ही संसर्गाची आठ वर्षांपूर्वी ५.५ असणारी टक्केवारी आता ०.७७ पर्यंत आली असून, तिची शून्याकडे वाटचाल सुरु आहे.

एचआयव्ही (एक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम) या संसर्गजन्य रोगाबद्दलची जनजागृती आणि उपाययोजनेच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने उचललेली पावले योग्य वाटेने पडत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कक्ष (डापकू) सध्या ग्रामीण भागात घरोघरी जाऊन यावर जनजागृती करताना दिसून येत आहे. त्यांचे हे परिश्रमच एचआयव्ही बाधितांचा टक्का कमी करण्यास मदत करीत आहेत.

डापकूमध्ये आल्यानंतर रुग्णांची तपासणी केली जाते. एआरटी सेंटरमध्ये त्याला गोळ्या दिल्या जातात, तसेच त्याचे समुपदेशन करून आधार दिला जातो. यामुळे संबंधित रुग्णाचे मनोबल वाढून आजारावर मात करण्यासाठी तो संघर्ष करतो. रुग्णाचा संघर्ष व रुग्णालयाचे परिश्रम आठ वर्षांपूर्वीची टक्केवारी सद्य:स्थितीत शून्याच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत करीत आहे.अपु-या मनुष्यबळावर यशस्वी कामगिरीडापकोमध्ये जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा पर्यवेक्षक यासह इतर तीन पदे आहेत. त्यापैकी दोन रिक्त असून, इतर ठिकाणीही अपुरे मनुष्यबळ असल्याने येणाºया अडचणींवर मात करीत डापकूने हे यश संपादन केले आहे.

बीड, अंबाजोगाईमध्ये एआरटी सेंटरएड्स ग्रस्तांसाठी जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात एआरटीची सुविधा आहे. येथे रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. गेवराई, परळी, माजलगाव, केज, धारूर, चिंचवण असे सहा लिंक एआरटीची सुविधा उपलब्ध आहे.

एचआयव्हीबाधित मातांची मुले जन्मली निगेटिव्ह२०११ ते मे २०१७ पर्यंत जिल्हा रुग्णालयात एचआयव्ही बाधित २९४ मातांची २३७ मुले निगेटिव्ह जन्मल्याचे समोर आले आहे. दहा वर्षांत केवळ ३१ बालके पॉझिटिव्ह असून, त्यापैकी दहा जणांचा मृत्यू झाला आहे. मागील तीन वर्षांत एकाही बालकाचा मृत्यू झाला नाही हे विशेष. प्रत्येक वर्षी किमान १० हजार महिलांची प्रसूती रुग्णालयात होते.

मोहिमेला गतिमान करण्यासाठी प्रयत्नांची गरजएचआयव्ही बाधित रुग्णांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जनजागृती मोहिमेला अधिक गतिमान करण्याची गरज आहे. यासाठी डापकू प्रशासनाने आलेल्या निधीचा पुरेपूर विनियोग प्रभावी जनजागृती व उपचारासाठी करावा.