शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जाहिरातबाजीवर आक्षेप घेत माजलगाव पालिकेच्या १२ नगरसेवकांचा स्वच्छता सप्ताहावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 18:22 IST

शहरात २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान केंद्रशासनाच्या निर्देशानुसार स्वच्छता सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाची साधी माहितीसुध्दा पालिकेने आम्हाला दिली नाही. तसेच स्वच्छताच करायची तर मग त्यासाठी रॅल्या, पोस्टरबाजी करुन जाहिरातबाजी कशासाठी, हा सवाल करत या सप्ताहावर आम्ही बहिष्कार घालत असल्याची माहिती पालिकेतील १२ नगरसेवकांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत दिली.  

माजलगाव (बीड ) : शहरात २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान केंद्रशासनाच्या निर्देशानुसार स्वच्छता सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाची साधी माहितीसुध्दा पालिकेने आम्हाला दिली नाही. तसेच स्वच्छताच करायची तर मग त्यासाठी रॅल्या, पोस्टरबाजी करुन जाहिरातबाजी कशासाठी, हा सवाल करत या सप्ताहावर आम्ही बहिष्कार घालत असल्याची माहिती पालिकेतील १२ नगरसेवकांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत दिली.  

केंद्रशासनाच्या निर्देशानुसार शहरात सध्या स्वच्छता सप्ताह सुरु आहे. मात्र हा सप्ताह आयोजित करतांना कोणत्याही नगरसेवकाला विश्वासात घेतले नाही, केवळ पत्रिका हातात टेकवुन कार्यक्रम घेत असल्याची माहिती देण्यात आली असा आरोप पालिकेतील १२ नगरसेवकांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत केला. मुख्य रस्ता सोडला तर वार्डावार्डात घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्याकडे अध्यक्षांना लक्ष देण्यास वेळ नाही, पालिकेची कचरा उचलण्याची स्वतःच्या मालकीची वाहने आहे ते सोडून खाजगी वाहनांवर वारेमाप खर्च चालविला आहे, दलितवस्तीचा निधी पडून जाणीवपूर्वक खर्च केला जात नाही, याबाबत तक्रार केली असता प्रशानाकडून चुकीची माहिती देण्यात येते, अध्यक्ष मनमानी स्वरुपात काम करत आहेत असा आरोपही यावेळी नगसेवकांनी केला. 

यासोबतच स्वच्छता सप्ताहावर होत असलेल्या खर्चाचा हिशोब अध्यक्षांना आम्ही विचारणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे गटनेते विजय आलझेंडे, शेख मंजुर, विजय शिंदे, सुदामती पौळ, रोहन घाडगे, राज सययद अहेमद, भागवतराव भोसले, राहुल लंगडे, नारायणराव होके, शिवसेनेचे नितीन मुंदडा, अशोक आळणे आदी नगरसेवक उपस्थित होते. पत्रकार परिषदेत सत्ताधारी नगरसेवक विनायक रत्नपारखी उपस्थित होते. या सर्वप्रकारावर त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली. 

प्रोजेक्ट डायरेक्टरवर आक्षेप स्वच्छता सप्ताहाचे काम हे एका स्विकृत सदस्यावर सोपविण्यात आले आहे. ते कोणत्या अधिकाराने प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणुन काम पाहत आहेत, त्यांच्या नियुक्तीवर आमचा तीव्र असल्याचे नगरसेवकांनी यावेळी सांगीतले. 

नगरसेवकांनी केला पालिकेसमोर घंटानाद पत्रकार परिषद संपल्यानंतर या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत पालिका कार्यालयासमोर स्वच्छता सप्ताहाविरोधात घंटानाद आंदोलन केले. 

माझे काम चांगले प्रोजेक्ट डायरेक्टर नेमण्याचा मला अध्यक्ष या नात्याने अधिकार आहे. काही नगरसेवकांकडून केवळ विरोधाला म्हणून विरोध सुरु आहे. सर्वसामान्यांना याबाबत काहीही तक्रार नाही. कितीही अडथळे आले तरी मी काम करत राहणार. आम्ही सर्व कामे चांगल्यारीतीने करत आहोत.- सहाल चाउस, अध्यक्ष, नगर परिषद माजलगांव

टॅग्स :Beedबीड