शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये बोंडअळीच्या नुकसानीचे अनुदान सर्व मंडळातील शेतकऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील वर्षीच्या खरीप हंगामात राज्यात कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला होता. या संदर्भात शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध शेतकºयांमधून संताप व्यक्त करण्यात आला. जनरेट्यामुळे अखेर सरकारला अन्यायकारी निर्णयात बदल करावा लागला असून आता जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील शेतकºयांना बोंडअळीच्या प्रादुर्भामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई ...

ठळक मुद्दे६३ मंडळात ३ लाख ७७ हजार हेक्टरातील कपाशीचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील वर्षीच्या खरीप हंगामात राज्यात कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला होता. या संदर्भात शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध शेतकºयांमधून संताप व्यक्त करण्यात आला. जनरेट्यामुळे अखेर सरकारला अन्यायकारी निर्णयात बदल करावा लागला असून आता जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील शेतकºयांना बोंडअळीच्या प्रादुर्भामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे.

बीड जिल्ह्यात कपाशीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामातही कापसाचे क्षेत्र वाढले होते. परंतू गुलाबी सेंद्रिय बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतक-यांना पहिल्या वेचणीनंतर उत्पादन मिळाले नाही. तसेच या वेचणीतही अत्यंत कमी उतारा मिळाला होता. हिवाळी अधिवेशनात बोंडअळीचा मुद्दा गाजला होता. यावेळी कृषी मंत्र्यांनी सरसकट मदतीची घोषणा केली होती.

त्यानुसार जिल्ह्यातील कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून करण्यात आले होते. शंभर टक्के क्षेत्र बाधित झाल्याचे या पंचनाम्यावरुन स्पष्ट झालेले असताना २३ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयात पीक कापणी प्रयोगानुसार कृषी विभागाकडून आलेल्या अहवालानुसार नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मिळाले. त्यानुसार जिल्ह्यातील ६३ पैकी २० महसूल मंडळच या मदतीसाठी पात्र ठरले. त्यामुळे शेतकºयांवर मोठा अन्याय होणार होता. तसेच कृषी आणि महसूल यंत्रणेचे अहवालही या निर्णयामुळे खोटे असल्याचा संदेश जनमानसात पोहचत होता. शासनाच्या या निर्णयानंतर जिल्हाभरात सर्वच राजकीय पक्ष, शेतकरी संघटनांनी आंदोलने केली.

जिल्हा प्रशासनाकडूनही जनभावना कळविण्यात आल्या होत्या. त्यामुळे शासनाला माघार घ्यावी लागली. अखेर १७ मार्च रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला. त्यानुसार महसूल व कृषी विभागाच्या अधिकाºयांनी केलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे कापूस पिकाचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या प्रकरणी बाधित शेतकºयांना मदत अनुज्ञेय राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ६५ मंडळातील शेतकरी पात्र ठरणार आहेत, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीcottonकापूसBeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र