शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

४ दिवसांपासून गायब ट्रॅक्टरचालकाचा मृतदेह आढळला तलावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 23:48 IST

तालुक्यातील घोडका राजूरी येथील एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह येथील तलावातील सांडव्याच्या भिंतीजवळ शनिवारी सकाळच्या सुमारास आढळून आला.

बीड : तालुक्यातील घोडका राजूरी येथील एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह येथील तलावातील सांडव्याच्या भिंतीजवळ शनिवारी सकाळच्या सुमारास आढळून आला. याची माहिती नागरिकांनी पोलिसांना देताच पिंपळनेर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज राम सकाडे (३५, रा.घोडका राजुरी,ता.बीड) असे मयताचे नाव आहे. तो गावात ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. चार दिवसांपूर्वी तो घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो परतलाच नाही. मनोज यांचा शोध नातेवाईक घेत होते. दरम्यान शनिवारी सकाळी मनोजचा मृतदेह घोडका राजुरी येथील तलावाच्या सांडव्याजवळ आढळून आला. ही माहिती मिळताच पिंपळनेर ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मृतदेह पाण्यावर तरंगत होता, पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. सुरुवातीला मयताची ओळख पटली नव्हती. त्यानंतर गावातील नागरिकांना हा मृतदेह मनोज सकाडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवला. याप्रकरणी मृताचे भाऊ शहादेव राम सकाडे यांच्या खबरेवरुन पिंपळनेर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.तोंडावरील मारामुळे संशय, पोलिसांचा तपास सुरुमयत मनोज यांना पोहता येत असल्याची ग्रामस्थांनी माहिती दिली. तसेच मृतदेह बाहेर काढला, त्यावेळी तोंडावर मार लागल्याचे दिसून येत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा अपघात आहे का घातपात; याचा तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातMurderखूनCrime Newsगुन्हेगारी