शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

माजलगावात भाजपचे मताधिक्य निम्म्याने घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:11 IST

मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत माजलगाव विधानसभा मतदारसंघात यावेळी भाजपा उमेदवाराची आघाडी ५० टक्क्याने घटली असून माजलगाव शहरात देखील भाजपाची चांगलीच पिछेहाट झाल्याचे निकालाने स्पष्ट केले आहे. माजलगाव तालुक्यापेक्षा वडवणी व धारूर तालुक्यात भाजपाला मोठे यश मिळाले.

ठळक मुद्देमाजलगाव विधानसभा मतदार संघ । वडवणी, धारुर तालुक्यातून चांगली आघाडी

पुरुषोत्तम करवा ।लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत माजलगाव विधानसभा मतदारसंघात यावेळी भाजपा उमेदवाराची आघाडी ५० टक्क्याने घटली असून माजलगाव शहरात देखील भाजपाची चांगलीच पिछेहाट झाल्याचे निकालाने स्पष्ट केले आहे. माजलगाव तालुक्यापेक्षा वडवणी व धारूर तालुक्यात भाजपाला मोठे यश मिळाले. या निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवाराने भरपुर मतदान खेचल्यामुळे भाजप तरले. त्यामुळे विरोधी राष्ट्रवादी सोबतच भाजपालाही चिंतन करण्याची वेळ आली आहे.बीड लोकसभा निवडणुकीत माजलगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना - भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना १ लाख १६६, राष्ट्रवादी कॉंग्रेस - काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांना ८३ हजार २८३ ,वंचित आघाडीचे प्रा.विष्णु जाधव यांना १९ हजार ८६ मते मिळाली. युतीच्या डॉ. प्रीतम मुंडे यांना १६ हजार ८८३ मतांची आघाडी या मतदार संघात मिळाली. मागील लोकसभा निवडणुकीत याच मतदार संघातुन स्व.गोपीनाथ मुंडे यांना ३५ हजार मतांची आघाडी मिळाली होती. मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत भाजपाची आघाडी ५० टक्क्यांपेक्षा जास्तीने घटली आहे. विशेष बाब म्हणजे भाजपकडून मातब्बर नेतेमंडळी प्रचारात उतरली होती. वंचित आघाडीचा उमेदवार या निवडणुकीत नसता तर वेगळेच चित्र पहावयास मिळाले असते. तालुक्यात मागील लोकसभेला भाजपला १८ हजार मताची आघाडी मिळाली होती. तर या निवडणुकीत केवळ ३ हजार ५०० मतांची आघाडी मिळु शकली.वडवणी तालुक्यातही मागील निवडणुकीच्या तुलनेत मतांच्या आघाडीत घट झाली. तर धारूर तालुक्यात मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी चांगली आघाडी मिळू शकली. माजलगाव शहरात आतापर्यंत भाजपला आघाडीच मिळत असे. विशेष बाब म्हणजे येथील नगरपालिका ही भाजपच्याच ताब्यात आहे. तरीही मताधिक्य घटले.अपक्षांना १५ हजार मतेमाजलगाव मतदार संघात भाजप - राष्ट्रवादी मध्ये दुरंगी लढत झाली असली तरी वंचित आघाडीला चांगलेच मताधिक्य मिळु शकले तर इतर ३४ उमेदवांपैकी २ उमेदवार वगळता इतर उमेदवारांना चार आकडी संख्या देखील ओलांडता आली नाही.तिघेही एकत्र !दोन वर्षांपूर्वी माजलगाव नगर पालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार १ हजार मतांनी निवडून आले होते.या निवडणुकीत न.प. मध्ये पहिल्या तीन मध्ये असलेल्या उमेदवारांनी भाजपचा प्रचार केला.मात्र, शहरात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला १ हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळाले.बड्या नेत्याची सभा नाहीया मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकाही बड्या नेत्याची सभा झाली नाही.अजित पवार यांची मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात सभा होती, परंतु तीही ऐनवेळी रद्द करण्यात आली.भाजपाकडून देखील पालकमंत्री पंकजा मुंडे वगळता कोणाचीही सभा झाली नाही.

 

टॅग्स :BeedबीडLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालBJPभाजपा