शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

बीड जि.प.च्या CEOना शिवीगाळ करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याला २२ मे पर्यंत तात्पुरता जामीन

By सोमनाथ खताळ | Updated: May 13, 2023 19:23 IST

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना दालनात घुसून शिवीगाळ करण्यात आली होती.

सोमनाथ खताळ, बीड: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना दालनात घुसून शिवीगाळ करण्यात आली होती. या प्रकरणात पालकमंत्री अतूल सावे यांचा पीए आहे, असे सांगणारे भाजप कार्यकर्ते धनराज राजाभाऊ मुंडे (रा.वडवणी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणात आता न्यायालयाने मुंडे यांना २२ मे पर्यंत तात्पूरता जामिन दिला आहे. तसेच सीईओंच्या पीएसह अंगरक्षक, शिपाई अशा पाच लोकांचे जबाब तपास अधिकाऱ्यांनी घेतले आहेत.

सीईओ पवार हे ११ मे रोजी दुपारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास वॉर रूममधील शिक्षकासोबत बोलत होते. याचवेळी धनराज हे दालनात आले. मी पालकमंत्र्यांचा पीए आहे. 'तुम्ही पालकमंत्र्यांचा फोन का उचलत नाहीत, तुम्ही स्वत:ला काय समजता, लावू का पालकमंत्र्यांना फोन, तुम्ही पालकमंत्र्यांना बोला' असे म्हणत गोंधळ घातला. त्यानंतर सीईओ पवार यांना शिवीगाळ केली. दालनातील हा आवाज ऐकून अंगरक्षक सचिन साळवे व स्वीय सहायक सचिन सानप हे दालनात आले. त्यांनी धनराज यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी हुज्जत घातली. या प्रकारानंतर स्वत: पवार यांनी बीड शहर पाेलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली होती. १२ मे रोजी या प्रकरणाचे पडसाद जिल्हाभरात उमटले. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत मुंडे यांना अटक करण्यासह कठोर कारवाईची मागणी केली होती.

धनराज मुंडे यांना अटक करण्यासाठी आम्ही गेलो होतो. परंतू ते मिळून आले नाहीत. आता त्यांना न्यायालयाने २२ मे पर्यंत तात्पूरता जामिन दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पुढील कारवाई केली जाईल. सध्या या प्रकरणात सीईओंचे पीए, बॉडीगार्ड, शिपाई अशा पाच लोकांचे जबाब घेतले आहेत. तसेच सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहेत. -रमेश गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक, बीड शहर

टॅग्स :BeedबीडBJPभाजपा