शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विधान परिषद मिळावी म्हणून क्षीरसागर पराभवाचे खापर भाजपवर फोडत आहेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 13:52 IST

भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांचा आरोप 

ठळक मुद्देभारतभूषण क्षीरसागर यांना जयदत्त क्षीरसागर निवडून यावे असे वाटत नव्हतेपराभवासाठी शहरातील खड्डे ठरले कारणीभूत

बीड : विधानसभेच्या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर विजयी व्हावेत यासाठी डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मला वा भाजपच्या एकही जबाबदार पदाधिकाऱ्यांना फोन केला नाही. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर निवडून यावेत, असे डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना वाटत होते का, अशी शंका आहे, तसेच पराभवाचे खापर भाजपवर फोडून विधान परिषद मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी पत्रपरिषदेत केला.

दोन दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्यांमुळेच जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाला उत्तर देण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप नेते राजेंद्र मस्के, जि. प. सदस्य अशोक लोढा, स्वप्नील गलधर, चंद्रकांत फड, प्रा. देविदास नागरगाजे आदींची उपस्थिती होती. चिंतन बैठकीमध्ये भाजपमुळेच पराभव झाल्याचे खोडसाळ मत व्यक्त केले गेले. क्षीरसागरांच्या घरातच समन्वयाचा अभाव होता. त्यांचे काम करा, असा एकही संदेश किंवा फोन डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी भाजपच्या एकाही जबाबदार पदाधिकाऱ्यांला केला नाही, त्यामुळे नेमका पराभव का झाला याचे उत्तर क्षीरसागर यांनी शोधावे. खापर भाजपवर फोडू नये. पंकजा मुंडे यांच्या आदेशाने आम्ही जीव तोडून प्रयत्न केल्याचा दावा  त्यांनी केला.

पराभवासाठी शहरातील खड्डे ठरले कारणीभूतशहरभर सर्वत्र खड्डे पडलेले होते. यापूर्वीच्या निवडणुकांत रात्रीतून रस्ते केले जात, तशी तगडी यंत्रणा त्यांच्याकडे असूनही खड्डे का बुजवले नाहीत. क्षीरसागर यांच्या पराभवासाठी हे जाणीवपूर्वक केल्याचा गंभीर आरोप पोकळे यांनी केला. क्षीरसागर यांनीही भाषणात रस्त्यावरील खड्ड्यांमुळेच मतदानात खड्डे पडल्याचा उल्लेख केला. परंतु, त्यांना बंधू भारतभूषण क्षीरसागर यांच्याविषयी थेट बोलता आले नाही. हा सर्व विधान परिषद मागण्यासाठी खटाटोप असल्याचेही  पोकळे म्हणाले. 

टॅग्स :Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरBeedबीडShiv Senaशिवसेना