शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

'आमचं ठरलंय, जय महाराष्ट्र'; पंकजा मुंडे यांच्या पोस्टर्समुळे भाजप कार्यकर्ते संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 17:28 IST

१२ डिसेंबर रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर कार्यक्रम

ठळक मुद्देपंकजा मुंडे यांनी १ डिसेंबर रोजी सोशल मीडियावरुन कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली होती.

- संजय खाकरे

परळी (जि. बीड) :  आमचं ठरलंय, जय महाराष्ट्र, चलो गोपीनाथ गड, असे संदेश भाजपा कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर  फिरत असल्याने शहरातील भाजपाचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. १२ डिसेंबर रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमात माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे काय निर्णय घेतात याकडे पुन्हा एकदा राज्याचे लक्ष लागलेले आहे. 

पंकजा मुंडे यांनी १ डिसेंबर रोजी सोशल मीडियावरुन कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली होती. १२ तारखेला पंकजा मुंडे कोणता निर्णय घेणार, या चर्चेला उधाण आले होते. त्यानंतर भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी स्वपक्षीयांमुळेच भाजपच्या काही उमेदवारांचा पराभव झाल्याचे विधान केले होते. त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  प्रत्युत्तर दिले होते. ही चर्चा रंगत असतानाच गोपीनाथ गडावरील कार्यक्रमाच्या चार दिवस आधी रविवारी आमचं ठरलंय, जय महाराष्ट्र, चलो गोपीनाथ गड, असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय निरीक्षकांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

विशेष म्हणजे सोशल मीडियावर अशा घोषणेचे पोस्टरवजा फोटोही व्हायरल झाला आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्ते एकमेकांना फोन करून पुढच्या रणनीतीवर चर्चा करीत आहेत. परंतु यासंदर्भात अधिकृत माहिती मात्र प्राप्त झालेली नाही. काहींच्या म्हणण्यानुसार पंकजा मुंडे या भाजपमध्येच राहणार. परंतु  जय महाराष्ट्राचा नारा सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

१२ तारखेकडे लक्षपरळी विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे या मुंबईला गेल्या. त्यानंतर त्या परळीत आल्याच नाहीत. आता १२ डिसेंबरच्या अनुषंगाने परळीत येणार असून कार्यकर्त्यांशी हितगुज साधणार आहेत. सध्या मात्र भाजपमध्येच राहणार की शिवसेनेत जाणार अशी चर्चा परिसरात सुरू झालेली आहे.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाBeedबीड