शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीसह गर्भवती प्रेयसीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 23:34 IST

अल्पवयीन मुलीसोबतच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पत्नीचा खून करून पतीने नंतर गर्भवती प्रेयसीचाही खून केला होता. चार वर्षांपूर्वी अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा शिवारात हे हत्याकांड घडले होते. याप्रकरणी सोमवारी अंबाजोगाई विशेष जिल्हा व सत्र न्या. एम.बी. पटवारी यांनी आरोपी पतीस पत्नीचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून आजन्म जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देअंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : येल्डा शिवारात घडले होते हत्याकांड

अंबाजोगाई : अल्पवयीन मुलीसोबतच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पत्नीचा खून करून पतीने नंतर गर्भवती प्रेयसीचाही खून केला होता. चार वर्षांपूर्वी अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा शिवारात हे हत्याकांड घडले होते. याप्रकरणी सोमवारी अंबाजोगाई विशेष जिल्हा व सत्र न्या. एम.बी. पटवारी यांनी आरोपी पतीस पत्नीचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून आजन्म जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.येल्डा शिवारात वकिलाची डाग नामक शेतात दिलीप हनुमंत खोडवे आणि त्याची पत्नी प्रीती (वय २१) हे दोघे राहत होते. दिलीप जनावरे चारण्यासाठी दररोज शेताच्या बाजूच्या डोंगरावर जात असे.तेथे एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती अल्पवयीन पीडिता गर्भवती राहिली.याची कुणकुण दिलीपच्या पत्नीला लागली होती ती अडसर ठरू लागली होती. त्यामुळे दि. ४ आॅक्टोबर २०१६ रोजी रात्री दिलीपने स्वत:च्या घरात पत्नीचा गळा दबून खून केला आणि त्यानंतर शेतात लिंबाच्या झाडाखाली गर्भवती प्रेयसीचाही गळा आवळला. दोघींचा खून केल्यानंतर दिलीपने स्वत:ही विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.अल्पवयीन पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून दिलीपवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात कलम पोक्सो आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी हरी बालाजी आणि विशाल आनंद यांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेहोते.१६ साक्षीदार तपासल्यानंतर निर्णयसुनावणी येथील विशेष जिल्हा व सत्र न्या. एम.बी. पटवारी यांच्यासमोर झाली. १६ साक्षीदार तपासल्यानंतर न्या. पटवारी यांनी आरोपी दिलीप खोडवे यास पत्नीचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरविले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली.दिलीपने अल्पवयीन पीडितेचा खून केल्याचा आरोप मात्र न्यायालयात सिद्ध होऊ शकला नाही. याप्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने सहा. सरकारी अभियोक्ता अशोक कुलकर्णी आणि फिर्यादीचे वकील अ‍ॅड. विलास लोखंडे यांनी कामकाज पहिले. त्यांना डॉ. नितीन पुजदेकर, पैरवी अधिकारी गोविंद कदम, पो.कॉ. बी.एस.सोडगीर, महिला पोलीस कर्मचारी शीतल घुगे यांची मदत झाली.

टॅग्स :BeedबीडCourtन्यायालय