शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
6
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
7
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
8
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
9
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
10
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
11
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
12
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
13
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
14
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
15
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
16
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
17
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
18
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
19
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
20
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

मोठी बातमी: देवस्थान जमीन घोटाळ्यात भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल

By संजय तिपाले | Published: November 30, 2022 11:34 AM

बीडमध्ये खळबळ: आ. सुरेश धस यांच्या पत्नी, भावाचाही आरोपींत समावेश आहे

बीड : आष्टी तालुक्यातील कथितआठ हिंदू देवस्थान जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणी २९ नोव्हेंबरला मोठी घडामोड घडली. भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी प्राजक्ता, बंधू देविदास, मनोज रत्नपारखी , अस्लम नवाब खान यांच्यावर भ्रष्टाचार  प्रतिबंध अधिनियम १९८८, बनावट कागदपत्रे तयार करून कट रचून फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 जिल्ह्यातील हिंदू  देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात गुन्हे दाखल करून चौकशी करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे पाठपुरावा करीत आहेत. खाडे यांच्याच याचिकेवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १८ ऑक्टोबर रोजी राम खाडे यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून गुन्हे दाखल करण्याचे आदेश लंचला;उचपात प्रतिबंधक विभागाला दि होते. खाडे यांनी आपल्या  तक्रारीत आ. सुरेश धस यांचे नाव घेतलेले असल्याने आ. सुरेश धस यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर  सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवीत आ.सुरेश  धस यांची याचिका फेटाळली आहे. दरम्यान, तक्रारदार राम खाडे यांची १३ जानेवारी २०२२ ची तक्रारच एफआयआर समजून गुन्हा दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते, त्यानुसार २९ रोजी  कलम १३(१)(अ) (ब),१३ (२) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८सह कलम- ४२०,४६५,४६७,४६८,४७१,१२० (ब)१०९ भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एसीबीचे उपअधीक्षक शंकर शिंदे करत आहेत.

आमदार धसांवर असा आहे ठपकाआमदार धस यांनीपदाचा गैरवापर करून इतर आरोपींशी  कट करून देवस्थानाच्या इनाम जमीन, शासनाच्या जमीन, सहकार विभागाच्या जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करून ते खरे आहेत,असे भासविले. देवस्थानच्या इनाम जमिनी बेकायदेशीर मार्गाने खालसा आदेश करून घेऊन मनोज रत्नपारखी व इतरांच्या नावे करून शासनाची फसवणूक केली. व बेकायदेशीर मार्गाने स्वतः चे व इतरांचे नावाने कोट्यावधी रुपयाची अपसंपदा मिळवली असा ठपका ठेवला आहे.

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसBJPभाजपाBeedबीड