शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

मोठा मासा पकडला, ठेवी परत कधी मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:24 AM

शुभकल्याण मल्टीस्टेटचा चेअरमन दिलीप आपेट यास शनिवारी पहाटे पुण्यात अटक केल्यानंतर ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

ठळक मुद्दे‘शुभकल्याण’चा दिलीप आपेट जेरबंद : जिल्हाभरात १० गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शुभकल्याण मल्टीस्टेटचा चेअरमन दिलीप आपेट यास शनिवारी पहाटे पुण्यात अटक केल्यानंतर ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील ४२० ठेवीदारांना गंडा घातला आहे. बीड, अंबाजोगाई, केज, नेकनूर, माजलगाव, परळी, गेवराई, वडवणी, आष्टी, धारूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. लोकमतने या प्रकरणी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने पोलीस तपासाला वेग आला आहे.मालमत्ता जप्त करण्याचा प्रस्तावदरम्यान जुलैमध्ये गेवराईच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाºयांना महाराष्टÑ ठेवीदार (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ अंतर्गत प्रस्ताव पाठविला. या पत्राचा आधार घेऊन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी गृहविभागाच्या सचिवांना पत्र पाठविले होते. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एस. पाटील यांनी दिलेल्या संस्थापक, चेअरमन यांची मालमत्ता जप्त करावी असे त्यात नमूद होते. ३३ आॅगस्ट रोजी छाटा मासा गळाला लागल्यानंतर दोनच दिवसात मोठा मासा पकडण्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. इतर आरोपींनीही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान मोठा मासा पकडला आता आपल्या ठेवी कधी मिळतील याची प्रतीक्षा ठेवीदारांना आहे.दिवसभर प्रतीक्षा : सायंकाळी अटकआर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाटील, उपनिरीक्षक योगेश खटके, कर्मचारी संजय पवार, अशोक ननवरे, अमोल कदम, राम बहिरवाळ, नितीन वडमारे, राजू पठाण, गंधारी मस्के, आयोध्या उबाळे यांच्या पथकाने शुक्रवारी पुणे येथे सापळा रचून दिलीप आपेट यास ताब्यात घेतले व पहाटे अटकेची कार्यवाही केली.गेवराईत १३ जणांवर गुन्हागेवराई येथील पोलीस ठाण्यात दोन महिन्यापूर्वी शुभ कल्याण मल्टीस्टेटच्या अध्यक्षासह संचालक अशा एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात १०० पेक्षा जास्त ठेवीदारांचे तब्बल १ कोटी १७ लाख रूपये अडकले आहेत.माजलगावात ९०० खातेदारमाजलगाव : माजलगाव येथील शुभकल्याण मल्टीस्टेटच्या शाखेमध्ये ९०० खातेदारांचे जवळपास सहा कोटी रुपये अडकले. शहर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. दीड वर्षांपासून सदरील शाखा बंद असल्याने ठेवीदार त्रस्त आहेत.परळीत ११२ ठेवीदारपरळी : परळी तालुक्यातील ११२ ठेवीदारांना ३ कोटी ८४ लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त वीज कर्मचारी शंकर राऊत यांच्या फिर्यादीवरून संभाजीनगर ठाण्यात ११ संचालकांविरुद्ध २६ जानेवारी २०१८ रोजी गुन्हा दाखल झाला होता.

टॅग्स :BeedबीडfraudधोकेबाजीArrestअटक