शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

बीड जिल्ह्यात मंदिराच्या दानपेटीत बाद नोटांची ‘भक्ती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 11:29 IST

पाचशे , एक हजाराच्या नोटा बंद होऊन वर्ष झाले आहे. तरीही शिल्लक राहिलेल्या नोटांचे काय करायचे? एका भक्ताने त्यावर चक्क दानपेटीचा पर्याय निवडला.

ठळक मुद्दे रविवारी येथील कालिकादेवीची दानपेटी विश्वस्त व समाजबांधवाच्या उपस्थितीत उघडली दान पेटीमधून चलनातून बंद झालेल्या पाचशे रुपयांच्या तब्बल २१ नोटा निघाल्या.

शिरूरकासार ( बीड) : पाचशे , एक हजाराच्या नोटा बंद होऊन वर्ष झाले आहे. तरीही शिल्लक राहिलेल्या नोटांचे काय करायचे? एका भक्ताने त्यावर चक्क दानपेटीचा पर्याय निवडला. रविवारी येथील कालिकादेवीची दानपेटी विश्वस्त व समाजबांधवाच्या उपस्थितीत उघडली असता त्यात चलनातून बंद झालेल्या पाचशे रुपयांच्या तब्बल २१ नोटा निघाल्या. परिसरात दिवसभर या बाद नोटांच्या भक्तीचीच चर्चा होती.  

कालिकादेवी हे परिसरातील एक जाज्वल्य देवस्थान असल्याने येथे दूरदूरहून भाविक दर्शनाला येतात. भाविक त्यांची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर केलेल्या नवसाप्रमाणे दानही देतात. याशिवाय मंदिरात दानपेटीत मोठ्या स्वरूपात देणगी दिली जाते. ही दानपेटी पंच व समाज बांधवांच्या उपस्थितीत उघडून रकमेची मोजदाद केली जाते.  रविवारी ही दानपेटी उघडली असता पाचशे रुपयांच्या २१ नोटा म्हणजेच १० हजार ५०० रुपये आढळून आले. दानपेटीत सर्वांसमक्ष निघालेल्या या नोटांची रीतसर नोंद घेतली असून, त्यांच्या नंबरचीदेखील नोंद दानपेटी पंचनामा वहीवर केल्याचे संस्थानचे अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :TempleमंदिरBeedबीडNote Banनोटाबंदी