शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

सोंगाढोंगाच्या लोकांपासून सावध राहा, धनुष्यबाण घराघरात पोहोचवा- जयदत्त क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:53 IST

गट तट बाजूला ठेवा, शिवसेनेचा विजय निश्चित आहे, असा विश्वास रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. विजयासाठी वज्रमुठ आवळा, गावाकडे जा, धनुष्यबाण घराघरामध्ये पोहचेल असे काम करा, सोंगाढोंगाची लोक गावाकडे येतील, गळ्यात हात घालून मतदान मागतील आणि याच हाताने कधी गळा दाबतील ते सांगता येत नाही, याची काळजी घ्या, गट तट बाजूला ठेवा, शिवसेनेचा विजय निश्चित आहे, असा विश्वास रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.राजुरी आणि कामखेडा या दोन पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांची बैठक वंजारवाडी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला साक्षाळपिंप्री, बहाद्दरपूर, रूद्रापूर, अव्वलपूर, केतुरा, सोनगाव, पारगाव, शहाजानपूर, बहीरवाडी, बेलूरा, उमरद जहॉगीर, तांदळवाडी, रोहिलिंबा, लिंबारूई, मुर्शदपूर, राजुरी, तिप्पटवाडी, काटवटवाडी, वंजारवाडी येथील शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, आजच्या या बैठकीला दोन पंचायत समिती गणातून मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलात. ही उपस्थिती विजय निश्चित करणारी आहे. वज्रमुठ आवळून कामाला लागायचं आहे. आता सर्वजण गावाकडे जात आहात. धनुष्यबाण घराघरात पोहच झाला पाहिजे. सोंगाढोंगाची लोक गावात येतील. कुणी जातीवर तर कुणी गळ्यात हात घालून मतदान मागतील. अशा ढोंगी मंडळींच्या भूलथापांना थारा देऊ नका. सगळ्यांनी मनातून मदत केली तर आपला विजयाचा अश्वमेध कोणी रोखू शकणार नसल्याचे जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले. यावेळी दिलीप गोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला जगदीश काळे, वैजीनाथ तांदळे, अरूण डाके, विलास बडगे, दिनकर कदम, नितीन धांडे, सखाराम मस्के आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात कैलास जगताप आणि निलेश जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा सत्कार क्षीरसागरांनी केला.सध्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाला निवडून आणण्याची सामान्य लोकांची स्पर्धा सुरू आहे. वातावरण अत्यंत पोषक आहे. मतभेद बाजूला ठेवा, मी कधी कोणाची जात किंवा गट याचा विचार केला नाही. आपलेपण जपण्याची हीच खरी संधी आहे. जनतेचे मुलभूत प्रश्न सोडवून घेण्यासाठी आणखी एका प्रयत्नाची गरज आहे.- जयदत्त क्षीरसागर, रोहयो मंत्री

टॅग्स :Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण