शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाचे नाते मातीशी जोडण्याचा उत्तम प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:25 IST

आगामी काळात येणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे समाजोपयोगी असून शिक्षणाचे नाते आपल्या मातीशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे प्रतिपादन विद्वत परिषेदेचे मराठवाडा संयोजक डॉ. संजीव सावजी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आगामी काळात येणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे समाजोपयोगी असून शिक्षणाचे नाते आपल्या मातीशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. यात भारतीय भाषा, संस्कृती, संशोधन आणि कौशल्य विकास यांचा समग्र विचार करण्यात आल्याचे प्रतिपादन विद्वत परिषेदेचे मराठवाडा संयोजक डॉ. संजीव सावजी केले.भा.शि.प्र.संस्थेच्या स्वा.सावरकर महाविद्यालयात विद्यासभेच्या वतीने शनिवारी विद्वत परिषदेत ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते.व्यासपीठावर भाशिप्रचे कार्यवाह नितीन शेटे, सहकार्यवाह प्रा. चंद्रकांत मुळे, डॉ.हेमंत वैद्य, वसंतराव देशमुख, विद्यासभेचे अध्यक्ष किरण भावठाणकर, डॉ. सुहास पाठक, डॉ. रांजनीकर, गणेश अग्निहोत्री, प्रकाश जोशी यांची उपस्थिती होती.डॉ. सावजी म्हणाले, शिक्षणाचा खरा उद्देश माणूस घडवणे आहे. नव्या शैक्षणिक धोरणात समग्र समाजाचा विचार केला आहे. आंतर शाखीय शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे. परीक्षा पद्धतीत बदल सुचिवले आहेत. शिक्षणातून रोजगाराचा विचार केल्याचे ते म्हणाले. तर ब्रिटिशांची शिक्षण पद्धत बदलणार आहे. गरजा लक्षात घेऊन मांडणी केल्याचे डॉ. सुहास पाठक म्हणाले. डॉ. रांजनीकर म्हणाले, आयोगाचे अध्यक्ष डॉ. कस्तुरीरंगन यांनी भारतीयत्वाचा विचार केला आहे. क्रीडा व कलेला प्रोत्साहन दिले आहे. किरण भावठणकर यांनी नव्या शैक्षणिक धोरणाची वैशिष्टये सांगितली.कार्यवाह नितीन शेटे म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणात अनेक समाजोपयोगी बदल आहेत. यामुळे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. नवी पिढी घडविणारे हे धोरण आहे. भाशिप्र्र संस्था आपला अजेंडा तयार करणार असल्याचे ते म्हणाले.प्रास्ताविक प्रकाश जोशी यांनी केले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. या परिसंवादाला केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुमंत दुबे, आर. आर. कुलकर्णी, बाबुराव आडे, विष्णु सोनवणे, विजय चाटूफळे,प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, प्राचार्य डॉ. संजय शिरोडकर, विद्यासभेचे पदाधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, विविध संस्थाचे प्रतिनिधी, शिक्षक, प्राध्यापक उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षणcultureसांस्कृतिक