शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

बीड जिल्ह्यातील ५ हजार १३२ अंगणवाडी सेविकांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:42 IST

राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा जिल्ह्यातील ५ हजार १३२ अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना लाभ होणार आहे.

ठळक मुद्देदोन वेळा तपासणी अनिवार्य : नवीन सेवेत येणाऱ्या सेविकांना तांत्रिक ज्ञान आवश्यक, भरतीवेळी घेण्यात येणार प्रावीण्य परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा जिल्ह्यातील ५ हजार १३२ अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना लाभ होणार आहे.जिल्ह्यात २४९० मोठया अंगणवाडी आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची संख्या जवळपास ४ हजार ९८० इतकी आहे. तर मिनी अंगणवाडींची संख्या ५५० इतकी आहे. येथील सेविका व मदतनीसांची संख्या एक हजाराच्या आसपास आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयाचा लाभ कार्यरत असलेल्या ५ हजार १३२ अंगणवाडी सेविका, मदतनीसांना होणार आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांवर केंद्र शासनाने सोपविलेल्या जबाबदाºया पाहता त्या शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. ६० वर्षानंतर कोणत्याही व्यक्तीस सक्षमपणे काम करण्यास वैद्यकीय कारणास्तव अडचणी येतात. त्यामुळे अशा व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असते. शासनाच्या निर्णयानुसार १ डिसेंबर २०१८ रोजी वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या अंगणवाडी सेविका-मदतनीसांची वैद्यकीय तपासणी करावी लागणार आहे. त्या काम करण्यास पात्र असल्याबाबतचे सक्षम वैद्यकीय अधिकाºयांचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्यांना मानधनी सेवेत ठेवण्यात येणार आहे. ६० तसेच ६३ वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर असे दोन वेळा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मार्च २०१८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्याचे आश्वासन दिले होते.सेविका नेमणुकीनंतर ६० वर्षांची सेवानव्याने नियुक्त (१ नोव्हेंबर २०१८ पासून) अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाड्यांच्या एकत्रिकरणानंतर मदतनीसाची अंगणवाडी सेविका म्हणून नेमणूक केल्यास त्यांची मानधनी सेवा ६० वर्षे राहणार आहे.अंगणवाडी केंद्राच्या कामकाजासह माहिती संकलनाचे कामकाज डिजीटल होत असून अंगणवाडीबाबतच्या नोंदी कॉमन अ‍ॅप्लीकेशन सॉफ्टवेअर मध्ये भरावयाच्या असल्याने अंगणवाडी सेविकांना तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी वेळोवेळी प्रावीण्य परीक्षा घेण्यात येणार आहे.

टॅग्स :BeedबीडEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा