शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना पूर्वीच्या बँक खात्यावर अनुदान द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:23 IST

बुधवारी अनुदानापासून वंचित लाभार्थ्यांना घेऊन पापा मोदी उपजिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. या विषयावर सकारात्मक चर्चा करून जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे निवेदन ...

बुधवारी अनुदानापासून वंचित लाभार्थ्यांना घेऊन पापा मोदी उपजिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. या विषयावर सकारात्मक चर्चा करून जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे निवेदन दिले.

संजय गांधी निराधार,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन,इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन,राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन यासह शासनाच्या वतीने सुरू असलेल्या विविध योजनेतील विद्यमान लाभार्थींचे अनुदान मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. जिल्हाधिकारी बीड यांनी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदान देण्याबाबत आदेशित केले होते. त्यामुळे खासगी बँकांमध्ये,जिल्हा बँकेत खाते असणाऱ्या लाभार्थ्यांना अद्याप अनुदान मिळाले नाही. तर दुसरीकडे राष्ट्रीयीकृत बँका विविध शासकीय योजनेतील लाभार्थ्यांचे बँक खाती आपल्या बँकेत सुरू करण्यास किंवा उघडून देण्यास अनुकूल दिसत नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांना त्यांच्या पूर्वीच्याच बँक खात्यात अनुदान रक्कम तत्काळ देण्याबाबत आदेशित करावेत. प्रशासनाला हे शक्य होत नसेल तर प्रत्येक तहसील कार्यालयातून या योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान नगदी रोख स्वरूपात देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.

या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी,महाराष्ट्र राज्य कापूस पणन व उत्पादक महासंघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. विष्णुपंत सोळंके,अंबाजोगाई शहराध्यक्ष महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक अमोल लोमटे,सुनील व्यवहारे,राणा चव्हाण,सचिन जाधव,महेश वेदपाठक,अमोल मिसाळ यांच्यासह गोरोबा सरवदे,इदरसुल हक जहूल हक,इंदुबाई वाघमारे,जुलेखा शेख रशीद,दत्तू गायकवाड,ग्यानबा धबडगे,विजयमाला गायकवाड,सटवा खलसे,गयाबाई धुमाळ,कौशल्या खलसे आदी विविध योजनेतील लाभार्थी उपस्थित होते.