शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

बीडच्या नवमतदारांनी दाखवली परिवर्तनाची ताकद, जिल्ह्याला ७७ वर्षांत मिळाले १८ खासदार

By सोमनाथ खताळ | Updated: May 9, 2024 19:46 IST

तुमचे पहिले मतदान कोणाला? २००४ मध्ये सर्वाधिक साडेचार लाख मतदार वाढले

बीड : जिल्ह्यात आतापर्यंत ७७ वर्षांत म्हणजेच १९५२ पासून २०१९ पर्यंत एका पोटनिवडणुकीसह १८ लोकसभा निवडणुका झाल्या आहेत. आता २०२४ ची १९ लोकसभा निवडणूक हाेत आहे. आतापर्यंत दोनवेळा मतदार संख्या कमी झाल्याचेही उघड झाले आहे. सर्वाधिक ४ लाख ६८ हजार मतदार हे २००४ मध्ये वाढले आहेत. यावेळी जयसिंगराव गायकवाडांनी पक्ष बदलल्यानंतरही त्यांची खासदारकीची हॅटट्रिक झाली होती. दरम्यान, वाढलेल्या नवमतदारांमध्येच खासदार बदलण्याची ताकद असल्याचे दिसून आले आहे. तसेच मतदारांनीही आपण पहिले मतदान कोणाला केले? याची आठवण यानिमित्ताने होत आहे.

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांचे वारे आता गतीने वाहू लागले आहे. २०२४ च्या निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे, तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी मिळाली आहे. या सर्वच उमेदवारांना जुन्यांसोबतच नवमतदारांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. कारण विजय, पराजय हा या नवमतदारांवरच अवलंबून असणार आहे.

दोन वेळा कमी झाले मतदार१८ निवडणुकांपैकी पैकी १६ वेळा मतदान वाढले आहे. सुरुवातीला १९५२ च्या मतदानापेक्षाही १९५७ मध्ये मतदारांची संख्या २१५० ने घटली होती. त्यानंतर १९९१ मध्ये मतदार संख्या १६ हजारांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे. १९५७ ला रखमाजी धोंडीबा खासदार झाले, तर १९९१ मध्ये केशरकाकू क्षीरसागर निवडून आल्या होत्या. त्याअगोदरही क्षीरसागर या दोनवेळा निवडणूक जिंकल्या होत्या.

जनजागृतीचा झाला फायदामतदानप्रक्रियेतून खासदारांसह इतर लोकप्रतिनिधी निवडले जातात. ज्यांना १८ वर्षे पूर्ण आहेत, अशांनी मतदार यादीत नाव लावावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जाते. तसेच महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृतीही केली जाते. शिक्षण, महसूल व इतर विभागांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवून नवमतदार नोंदणी केली जाते. यामुळेच मतदार संख्या वाढत आहे.

२०१९ मध्ये अडीच हजार ‘नोटा’ मतदान २०१९ च्या निवडणुकीत तब्बल ३६ उमेदवार हे लोकसभा निवडणूक रिंगणात उतरले होते. यावेळी डॉ. प्रीतम मुंडे या दीड लाखापेक्षा अधिक मते घेऊन विजयी झाल्या; परंतु याच निवडणुकीत तब्बल अडीच हजार मतदारांनी ३६ पैकी एकालाही पसंती न देता ‘नोटा’ मतदान केले होते. हा पर्याय मागील काही निवडणुकांपासून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मतदानाचा टक्का वाढविण्याची गरजइतर निवडणुकांप्रमाणे लाेकसभा निवडणुकांच्या मतदानाचाही टक्का वाढण्याची नितांत गरज आहे. २०१९ मध्ये २० लाख मतदारांपैकी १३ लाख ५२ हजार मतदारांनीच हक्क बजावला होता. उर्वरित मतदारांनी मतदान करण्यास अनुत्सुकता दर्शविली; परंतु प्रशासनाने हा टक्का वाढविण्यासाठी आणि मतदानापासून दूर असणाऱ्यांसाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.

वर्षे - मतदान - वाढलेले मतदार २०२४ - २११५८१३ - ७०४०८ २०१९ - २०४५४०५ - २०७४१८ २०१४ पोटनिवडणूक - १८३७९८७ - ४५३३५ २०१४ - १७९२६५२ - १५५४१३ २००९ - १६३७२३९ - ३१७३४८ २००४ - १३१९८९१ - ४६८३०० १९९९ - ८५१५९१ - १८६०९७ १९९८ - ६६५४९४ - ६४०८ १९९६ - ६५९०८६ - ४९३७२ १९९१ - ६०९७१४ - १६०२४ (कमी झाले) १९८९ - ६२५७३८ - १५२५४२ १९८४ - ४७३१९६ - ९०२३७ १९८० - ३८२९५९ - २८२९९ १९७७ - ३५४६६० - ७४८४२ १९७१ - २७९८१८ - २२०२ १९६७ - २७७६१६ - ९७०३४ १९६२ - १८०५८२ - ५६४७९ १९५७ - १२४१०३ - २१५० (कमी झाले) १९५२ - १२६२५३ - ००००मतदान वाढले १९८९५६०

टॅग्स :beed-pcबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४