सेामनाथ खताळ
बीड : कोेरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असली तरी आरोग्य यंत्रणा या विरोधात लढा देण्यासाठी सतर्क असल्याचे दिसते. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा (प्राणवायू) तुटवडा जाणवल्याचे पाहून आता यापुढे दररोज तब्बल १४७ मेट्रिक टन एवढी ऑक्सिजन निर्मिती करण्याची तयारी केली आहे. यात सध्या ८ प्लांट कार्यान्वित केले असून २१ चे काम प्रगतीपथावर आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल ते जुलै महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. रुग्णालयात खाटा अपुऱ्या पडण्यासह औषधी व ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला होता. आरोग्य व महसूल प्रशासनाकडून ऑक्सिजन निर्मितीसाठी दिवसरात्र एक केली होती. अनेकदा पोलीस बंदोबस्तात ऑक्सिजन लिक्विड असलेले टँकर बीडमध्ये आले होते. मे महिन्यात तर एका दिवसात तब्बल ४८.६० मे.टन ऑक्सिजन एका दिवसात लागले होते. हाच धागा पकडून शासनाने संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी केली. यापूर्वी जेवढा ऑक्सिजन लागला त्यापेक्षा आता तिप्पट तयार करण्याचे धोरण घेतले. त्याप्रमाणे आता ऑक्सिजन निर्मिती केली जात आहे. प्रस्तावित असलेल्या प्लांटचेही काम प्रगतीपथावर आहे.
====
सध्या निर्मित व लिक्विड असे ८ प्लांट कार्यान्वित आहेत. आणखी २१ प्लांट प्रस्तावित असून काहींचे काम ७५ टक्केपेक्षा जास्त झाले आहे. विद्युत, सुरक्षा व इतर किरकोळ कामे बाकी आहेत. हे सर्व प्लांट कार्यान्वित झाल्यास एका दिवसात १४७ मे.ट.ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते, तसेच जंबो व ड्युरा सिलिंडरही भरपूर आहेत.
डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक बीड.
===
सध्या कार्यान्वित प्लांट
लोखंडी सावरगाव स्त्री रुग्णालय, बीड, अंबाजोगाई १ = ऑक्सिजन निर्मिती प्रत्येकी १.७५ मे.ट.
---
कार्यान्वित असलेले ऑक्सिजन लिक्विड प्लांट
बीड, लोखंडी सावरगाव, अंबाजोगाई २ = निर्मिती प्रत्येकी ११.४० मे.ट.
--
प्रस्तावित ऑक्सिजन निर्मित प्लांट
अंबाजाेगाई २, बीड २, आष्टी, लोखंडी २, परळी, केज, माजलगाव = प्रत्येकी १.७५ मे.ट.निर्मिती
---
प्रस्तावित लिक्विड प्लांट
आष्टी, अंबाजोगाई, बीड, माजलगाव, गेवराई, परळी, लोखंडीसावरगाव = प्रत्येकी १४.८२ मे.ट.
---
यांच्याकडून मिळालेले सहकार्य
रिलायन्सकडून ३ प्लांट = क्षमता ४४ जंबो सिलिंडर निर्मिती
पंतप्रधान योजनेतून अंबाजोगाईला प्लांट = १.८७ मे.ट.
परळीतील थर्मल विभागाकडून अंबाजोगाईला प्लांट - २.८८ मे.ट.
---
उपलब्ध सिलिंडर
७ हजार लिटर क्षमता असलेले १५८६ जंबो सिलिंडर
१०० जंबो सिलेंडरचा एक, असे २३ ड्युरा सिलिंडर
---
जिल्ह्यात एका दिवसात ऑक्सिजन निर्मिती होणार = १४७ मे.ट.
250921\25_2_bed_23_25092021_14.jpg~250921\25_2_bed_22_25092021_14.jpeg
डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड~जिल्हा रूग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती प्लांट.