शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बीडचे प्रशिक्षण केंद्र मराठवाड्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 16:30 IST

आजार, योजनांची डॉक्टर, कर्मचाऱ्यांना दिली योग्य माहिती

ठळक मुद्देबीडनंतर औरंगाबादचा क्रमांक

बीड : आजार, योजना व इतर आरोग्य विषयक माहिती जिल्ह्यातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना देण्यात बीडचे जिल्हा प्रशिक्षण केंद्र मराठवाड्यात अव्वल राहिले आहे. महाराष्ट्रातही पालघरनंतर बीडचा दुसरा क्रमांक आहे. नुकतीच आरोग्य विभागाने ही रँक जाहीर केले आहे. 

बीडमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अंतर्गत जिल्हा व जिल्हा शल्य चिकित्सकांतर्गत रूग्णालयीन प्रशिक्षण अशी दोन केंद्र आहेत. या केंद्रांमध्ये विविध २२ प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये नियमित लसीकरण, असंसर्गिक आजार, प्रसुती पश्चात संतती नियमन, नवजात शिशू सुरक्षा कार्यक्रम, स्तनपान व शिशु पोषणाचे महत्व, माता व बालकांच्या सेवा, राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रम आदींचा समावेश असतो. प्रत्येक वर्षाला या केंद्रांना उद्दिष्ट दिले जाते. 

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.आर.ए.हुबेकर, डॉ.संतोष गुंजकर यांनी समन्वय ठेवून हे उद्दिष्टपूर्ती सहज पार केली आहे. बीडला ९५.९५ टक्के मिळाले असून महाराष्ट्रात दुसरा तर मराठवाड्यात हे केंद्र अव्वलस्थानी आहे. शाखा सदस्य, आर.वाय.कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, अभय भोकरे आदी टिम यासाठी परिश्रम घेत आहे. 

यांना दिले जाते प्रशिक्षणतालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, एएनएम, स्टाफ नर्स, आरोग्य सहाय्यक, आशा सेविका आदींना केंद्रात विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. 

बीडनंतर औरंगाबादचा क्रमांकमराठवाड्यात बीड अव्वल असून औरंगाबादचा दुसरा क्रमांक येतो. त्यानंतर लातूर, हिंगोली, जालना, परभणी, नांदेड, उस्मानाबादचा क्रमांक येतो. सर्वात निच्चांक उस्मानाबादचा असून ३३ व्या स्थानी आहे. 

रूग्णालयीनमध्ये पाचव्या स्थानीजिल्हा प्रशिक्षणमध्ये बीड राज्यात दुसऱ्या स्थानी आहे. तर रूग्णालयीनमध्ये पाचव्या स्थानी आहे. मराठवाड्यात लातूरनंतर बीडचा क्रमांक येतो. डॉ.ए.आर.हुबेकर याचे प्र्रमुख आहेत. 

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्कस यांच्या मार्गदर्शनाखाली उद्दिष्टपूर्ती केली आहे. ९५ टक्के गुण घेऊन अव्वल राहिल्याचा आनंद आहे. यात सातत्य ठेवून डॉक्टर, कर्मचाऱ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्याचा कायम प्रयत्न असेल.- डॉ.संतोष गुंजकर, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा प्रशिक्षण केंद्र, बीड

टॅग्स :Beedबीडdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीड